
Vice President Jagdeep Dhankhar resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचं कारण देत आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असताना हा राजीनामा समोर आला आहे. या घटनाक्रमानंतर लोकांच्या मनात पुढचे उपराष्ट्रपती कोण असतील याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एक नाव सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रातील या नेत्याची देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी नियुक्ती केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. (Who will be next Vice President)
महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. हरिभाऊ बागडे फुलंबरी विधानसभेवरुन पाच वेळा आमदार राहिले आहेत. हरिभाऊंना लोक नाना म्हणून संबोधतात. हरिभाऊचं लहानपण अत्यंत गरीब कुटुंबात गेले. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यामुळे कुटुंबाच्या मदतीसाठी हरिभाऊंनी अनेक वर्षांपर्यंत औरंगाबादमधील फुलंबरीमध्ये घरा-घरात जाऊन वृत्तपत्र विकले. शेतकरी कुटुंबातून आलेले हरिभाऊ यांचं शेतीवर इतकं प्रेम आहे की, यातूनच त्यांचं नाव कृषी योग ठेवण्यात आलं. हरिभाऊ बागडे राजस्थानचे 45 वे राज्यपाल ठरले.
हरिभाऊ बागडे यांचा राजकीय प्रवास...
हरिभाऊ बागडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले आहेत. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1944 रोजी झाला. राज्यात भाजप बाळसे धरत असताना 1985 मध्ये तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते सर्वप्रथम आमदार झाले. 1995 मध्ये रोहयो मंत्री झाले. 2009 मध्ये फुलंब्रीतून त्यांचा पराभव झाला. मात्र नंतर 2014 आणि 2019 मध्ये सलग दोनदा ते पुन्हा आमदार झाले. 2014 ते 2019 या काळात त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले. 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world