दिल्ली मेट्रो ही देशातील सर्वात मोठी मेट्रो सेवा आहे. दिल्ली मेट्रोमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र मेट्रोतील वाढणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये वादाचं प्रमाणही वाढलं आहे. या वादाचे अनेक व्हिडीओ देखील समोर येत असतात. असाच दोन महिलांमध्ये जागेवरुन झालेल्या वादाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे दोन महिला आपापसात भांडताना दिसत आहेत. दोन्ही महिला एकमेकींना शिविगाळ करताना दिसत आहेत.
(नक्की वाचा- GST Notice to Panipuriwala : तामिळनाडूतील पाणीपुरीवाला GST नोटीसमुळे चर्चेत, कमाई पाहून सगळेच चक्रावले!)
व्हिडीओतील दृश्यानुसार, एक महिला सीटवर बसलेली दिसत आहेत. तर एक महिला उभी आहे. उभी असलेली महिला थेट दुसऱ्या महिलेच्या मांडीवर जाऊन बसल्याने हा वाद झाल्याचं महिलांच्या संभाषणातून कळत आहे. बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादानंतर महिला थेट मांडीवर बसल्याने दुसऱ्या महिलेचा राग अनावर झाला.
(नक्की वाचा- Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)
त्यानंतर दोन्ही महिलांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र उभ्या असलेल्या महिलेना बसलेल्या महिलेच्या कानशिलात लगावल्याने वाद वाढला. त्यानंतर बसलेल्या महिलेने समोरील महिलेचे केस ओढत तिला मारहाण केली. मात्र वाद वाढत असल्याचे पाहून इतर महिलांना मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्ली मेट्रोमध्ये बसण्याच्या जागेवरुन होणारे वाद चिंतेचा विषय बनत चालले आहेत.