विकास दिव्यकीर्तिंचं दृष्टी IAS कोचिंग सेंटर सील; दिल्ली पालिकेची मोठी कारवाई

दिल्ली पालिकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटरविरोधात अभियान सुरू आहे आणि याअंतर्गत अनेक कोचिंग सेंटरविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

दिल्लीतील जुनं राजेंद्र नगर स्थित राव IAS स्टडी सर्कलच्या तळघरात पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर दिल्ली पालिकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटरविरोधात अभियान सुरू आहे आणि याअंतर्गत अनेक कोचिंग सेंटरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 29 जुलै रोजी देशातील प्रसिद्ध शिक्षक विकास दिव्यकीर्ति यांच्या (Vikas Divyakirti Drishti) दृष्टि IAS कोचिंग सेंटरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पालिकेने दृष्टि कोचिंग सेंटर सील केलं आहे. यावेळी तळघरात 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. त्यामुळे कोचिंग सेंटर सील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

नक्की वाचा - जुनं राजेंद्र नगरमधील इन्स्टिट्यूटमध्ये पाणी शिरलं; UPSC ची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू

कोण आहे विकास दिव्यकीर्ति?
सद्यपरिस्थितीत विकास दिव्यकीर्ति  देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या नेतृत्वात दृष्टि IAS नावाचं कोचिंग सेंटर चालवलं जातं. देशातील विविध शहरांमध्ये दृष्टि आयएएस सेंटर तयार करण्यात आलं आहे. युट्यूबवर त्यांचे लेक्चर मोठ्या संख्येने पाहिले जातात.