दिल्लीतील जुने राजेंद्रनगरमधील (UPSC Student) एका इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने युपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 27 जुलैच्या रात्रभर NDRF च्या टीमचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. दरम्यान तिघांचे मृतदेह सापडले आहेत.
दिल्लीत गेल्या काही दिवसात मुसळधार (Delhi Rain) पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यातच जुनं राजेंद्र नगर येथील एका इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये पाणी भरलं होतं. पाण्यात बुडाल्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली फायर डिपार्टमेंटला सायंकाळी सात वाजेच्या आसपास कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तीन विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळाली होती. सुरुवातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि एक बेपत्ता झाल्याची माहिती होती. या घटनेनंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी एमसीडीविरोधात आंदोलन पुकारलं आहे.
#WATCH | Old Rajender Nagar Incident | Delhi: Rescue and search operations continue at Delhi's Old Rajender Nagar where three students lost their lives after the basement of a coaching institution was filled with water. pic.twitter.com/fhyaYWwbiG
— ANI (@ANI) July 27, 2024
देशभरातील विद्यार्थी जुने राजेंद्र नगर परिसरात युपीएससीच्या क्लासेससाठी राहतात. संध्याकाळी सातच्या सुमारास पोलिसांना एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काही विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. पावसाचे पाणी घुसल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं आहे. स्वाती मालिवाल यांनी घटनेची दखल घेतील आहे. तर मंत्री आतिशी यांनी पण मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी विजेचा शॅाक लागून अशाच एका युपीएससी करणा-या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world