जाहिरात

भन्नाट देसी जुगाड! पेट्रोल शिवाय धावणारी बाईक

आता असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. शिवाय ज्याने हा देसी जुगाड केला आहे त्याचेही कौतूक केल्या शिवाय राहणार नाही.

भन्नाट देसी जुगाड! पेट्रोल शिवाय धावणारी बाईक
नवी दिल्ली:

Jugaad Video: सोशल मीडियीवर कधी काय व्हायर होईल याचा नेम नाही. कधी कोणी कोणत्या गाडीचं हेलिकॉप्टर बनवतो, तर कोणी भंगाराच्या साहित्यातून टिकावू वस्तू बनवतो. यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायल मिळतात. देशी जुगाड करून बनवलेल्या या गोष्टींचे कौतूक ही केले जाते. आता असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. शिवाय ज्याने हा देसी जुगाड केला आहे, त्याचेही कौतूक केल्या शिवाय राहणार नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंन्टाग्रामवर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहील्यानंतर तुम्हाला सुरूवातीला काय होत आहे हे समजणारच नाही. एका व्यक्तीने भंगारात पडलेल्या एका बाईकचा चांगला उपयोग केला आहे. या बाईकला त्याने देसी जुगाड करत सायकलेचे पायंडल आणि चैन लावली आहे. त्यामुळे ही बाईक पायंडल मारल्यानंतर सायकल प्रमाणे धावत आहे. दिसायला ती बाईक सारखी दिसते. यासाठी कोणत्याही प्रकारच्या पेट्रोलची गरज नाही. या देसी जुगाडू बाईकचा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायर होत आहे. 
 

या व्हीडिओला इंस्टाग्रामवर  @sonufitness535 नावाच्या अकाउंडवरून शेअर करण्यात आले आहे. या व्हीडिओला आता पर्यंत 12 लाख पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर 52 मिलियन पेक्षा जास्त वेळा हा व्हीडिओ पाहीला गेला आहे. या व्हीडिओवर कंमेटही मोठ्या प्रमाणात येत आहेत. एकाने यावर कमेंट करताना ही स्प्लेंडर आहे की सायकिलेंडर? तर एकाने अशाच लोकांना भारतरत्न दिला पाहीजे असे म्हटले आहे. तर ट्रॅफीक पोलिस शॉक, बंदा रॉक्स अशी ही कंमेट करण्यात आली आहे. तर व्यायामासाठी भारी जुगाड असेही एकाने कमेंटमध्ये म्हटले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
छत्तीसगडमध्ये 36 नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठं यश
भन्नाट देसी जुगाड! पेट्रोल शिवाय धावणारी बाईक
ic-814-kandahar-hijacking-web-series-anubhav-sinha-says-terrorists-were-playing-antakshari-with-passengers-apologised-to-the-pilot-and-hugged-him
Next Article
IC 814 Hijack : प्रवाशांसोबत अंताक्षरी ते दहशतवाद्याकडून माफी, अनुभव सिन्हाच्या वेब सीरिजमध्ये काय आहे?