Village unique tradition: एका गावात, सुमारे शंभर वर्षांपासून 'पितृ पक्ष' दरम्यान श्राद्ध न करण्याची परंपरा आजही पाळली जात आहे. या काळात तर्पण करण्यासाठी कोणत्याही ब्राह्मणाला बोलावले जात नाही. गावात भिक्षाही दिली जात नाही. पितृ पक्षाच्या पूर्ण पंधरवड्यात कोणतेही श्राद्ध कर्म केले जात नाही. इतकंच नव्हे तर या दिवसांमध्ये गावात कोणतीही भिक्षा किंवा दान दिले जात नसल्यामुळे, भिकारीही गावात येत नाहीत. हे गाव उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात आहे. या गावाचं नाव भगता नगला असं आहे. हे गाव गुन्नौर तहसीलमध्ये असून ते यादव बहुल आहे. श्राद्ध न करण्या मागची स्टोरी ही मोठी रोचक आहे.
गावात पितृ पक्षावर श्राद्ध पूर्णपणे वर्जित
गावकऱ्यांच्या मते, ही परंपरा सुमारे एक शतकापूर्वी सुरू झाली आहे. असे मानले जाते की, एका ब्राह्मण महिलेच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाल्यानंतर, ती कर्मकांडासाठी गावात आली होती. पण मुसळधार पावसामुळे तिला तिथेच थांबावे लागले. काही दिवसांनंतर ती घरी परतल्यावर तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला घरातून बाहेर काढले. गावकऱ्यांनी सांगितले की, दुःखी होऊन ती महिला भगता नगला गावात परत आली. तिच्या या दुर्दशेला तिचा प्रवास कारणीभूत मानून तिने गावाला शाप दिला. "भविष्यात जर या गावात श्राद्ध झाले तर ते त्या कुटुंबावर दुख: कोसळेल." गावकऱ्यांनी तिच्या शब्दांना शाप मानून श्राद्ध करणे पूर्णपणे बंद केले. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे.
गावाच्या सरपंच शांती देवी आणि त्यांचे पती रामदास यांनी सांगितले की, गावात सुमारे 2,500 रहिवासी आहे. त्यापैकी बहुतेक यादव समाजाचे आहेत. काही मुस्लिम आणि काही ब्राह्मण कुटुंबंही आहेत. रामदास म्हणाले, "त्या घटनेनंतर आमच्या पूर्वजांनी श्राद्ध करणे बंद केले. आम्ही त्यांच्या मान्यतेचे पालन करतो. आजही ही परंपरा सुरू आहे. इतकंच नव्हे, तर भिकारीही या दिवसांमध्ये गावात येत नाहीत. असं रामदास यांनी सांगितले.
हेतराम सिंग हे ही याच गावात राहातात. त्यांचे वय 62 वर्षे आहे. त्यांनीह आपला अनुभव सांगितला आहे. ते म्हणतात की भूतकाळात ज्यांनी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे लोकांचा विश्वास आणखी वाढला. रामफल हे ही याच गावचे रहिवाशी आहे. त्यांचे वय ही 69 वर्षे आहे. त्यांनी सांगितले की, "श्राद्ध पक्ष वगळता, ब्राह्मण लग्नांसाठी आणि इतर धार्मिक विधींसाठी गावात येतात. पण या 15 दिवसांदरम्यान, इथले स्थानिक ब्राह्मणही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात भाग घेत नाहीत. इतक्या या गोष्टी मानल्या आणि पाळल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं.