जाहिरात

Viral Girl मोनालिसाच्या लग्नामागे मोठं षडयंत्र? '35 तुकडे' आणि 'सीरिया'च्या दाव्याने खळबळ!

Viral Girl Monalisa Bhosale's Marriage:  सर्वोच्च न्यायालयाच्या वकील नाझिया इलाही यांनी या प्रकरणावर अत्यंत खळबळजनक दावे केले असून, हे लग्न नसून एक मोठे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

Viral Girl मोनालिसाच्या लग्नामागे मोठं षडयंत्र? '35 तुकडे' आणि 'सीरिया'च्या दाव्याने खळबळ!
Monalisa Bhosale's Marriage: मोनालिसाच्या लग्नावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मुंबई:

Viral Girl Monalisa Bhosale's Marriage:  कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसा भोसलेचं लग्न सध्या संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनलं आहे.   सर्वोच्च न्यायालयाच्या वकील नाझिया इलाही यांनी या प्रकरणावर अत्यंत खळबळजनक दावे केले असून, हे लग्न नसून एक मोठे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. या विवाहामुळे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत, यामागे काही विघातक शक्तींचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

लव्ह जिहादचा खळबळजनक दावा

मोनालिसा भोसले आणि फरमान खान यांचा विवाह हा साधासुधा प्रेमविवाह नसून तो लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचा स्पष्ट आरोप नाझिया इलाही यांनी केला आहे. त्यांच्या मते, या संपूर्ण प्रक्रियेत इस्लामिक जिहादी संघटना आणि पीएफआयचा सहभाग असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या विवाहात हिंदू मॅरेज अॅक्ट 1956 मधील तरतुदींचे सरळसरळ उल्लंघन झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. हिंदू धर्मातील पवित्र प्रथा आणि विवाह संस्कारांचा यात गैरवापर करून त्याची एक प्रकारे थट्टाच उडवली गेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

( नक्की वाचा : Haris Ali : भाऊ-बहीण डॉक्टर, वडील मोठ्या कंपनीत; पण धाकटा भाऊ निघाला 'ISIS'चा हस्तक! )
 

कायदेशीर पेच आणि फरमान खानची भूमिका

या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न फरमान खानच्या भूमिकेवर उपस्थित केला जात आहे. पत्रकार परिषदेत बोलताना फरमानने आपण अजूनही मुसलमान असल्याचे मान्य केले होते. यावर आक्षेप घेत इलाही यांनी विचारले आहे की, जर एखादी व्यक्ती स्वतःला मुसलमान म्हणवून घेत असेल, तर ती हिंदू पद्धतीने लग्न कशी करू शकते? हिंदू मॅरेज अ‍ॅक्टनुसार लग्न करण्यासाठी संबंधित व्यक्तीने हिंदुत्व स्वीकारणे अनिवार्य असते. फरमानने तसे केले असेल, तर त्याचा अधिकृत पुरावा अद्याप समोर का आलेला नाही, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मोनालिसाच्या जीवाला धोका आणि सीरिया कनेक्शन

या वादातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मोनालिसाच्या जीवाला असलेला कथित धोका. नाझिया इलाही यांनी अत्यंत गंभीर शब्दात इशारा दिला आहे की, आम्हाला मोनालिसा जिवंत पाहायची आहे, तिचे 35 तुकडे झालेले पाहायचे नाहीत. सूत्रांच्या हवाल्याने त्यांनी असाही दावा केला आहे की, मोनालिसाला सीरियाला पाठवण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पीएफआयच्या फंडिंगपर्यंत जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, या संपूर्ण कटात अनेक दहशतवादी प्रवृत्ती सक्रिय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चित्रपटाच्या सेटवरून सुरू झालेली ही गोष्ट आता थेट राष्ट्रपतींपर्यंत नेण्याची मागणी नाझिया इलाही यांनी केली आहे. मोनालिसा आणि फरमान यांची ओळख एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती आणि अवघ्या 6 महिन्यांत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, आता या लग्नाभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले असून, यात नक्की काय सत्य आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com