- बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका खासगी शाळेच्या 60 वर्षीय संचालकाने 28 वर्षीय शिक्षिकेसोबत विवाह केला आहे
- या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून चर्चेला सुरुवात झाली आहे
- संचालक राकेश शाह यांना आधीच चार मुले असून त्यांनी प्रेमासाठी कुटुंबाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे
'प्रेमाला वय आणि धर्माचे बंधन नसते', याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. औराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेच्या 60 वर्षीय संचालकाने आपल्याच शाळेतील 28 वर्षीय शिक्षिकेसोबत विवाह केला आहे. या विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे लग्न करताना दोघांनी ही ना वय पाहीलं ना जात पाहीली ना धर्म पाहिला. त्यामुळे या लग्नाची चर्चा सगळीकडेच होत आहे.
नक्की वाचा - Trending News: ना थाटमाट ना बँड-बाजा! 2 IAS अधिकाऱ्यांच्या साध्या लग्नाची मोठी चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्याऔराई येथे राकेश शाह राहतात. त्यांचे वय 60 वर्षे आहे. ते एक खासगी शाळा चालवतात. त्या शाळेचे ते संचालक आहे. याच शाळेत शाइस्ता परवीन नावाची तरुणी शिक्षिका आहे. तिचे वय 28 वर्षे आहे. या शाळेत एकत्र काम करत असताना दोघांमधील जवळीक वाढली. ती इतकी वाढली की त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. विशेष म्हणजे राकेश शाह यांना आधीच चार मुले आहेत. मात्र त्यांनी आपल्या प्रेमाखातर कुटुंबाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.
शेवटी 18 फेब्रुवारी रोजी हे दोघेही अचानक बेपत्ता झाले होते. त्यांनी नेपाळमध्ये जाऊन एका मंदिरात देवाला साक्षी मानून लग्न केल्याची चर्चा आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र व्हायरल झालेल्या फोटोत या दोघांनी ही लग्न केल्याचे स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे हे दोघे आता गावात परत कधी येतात याकडे सर्वांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे ही लक्ष लागले आहे.