उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली आहे. जगभरातून साधू आणि भक्तांची रीघ प्रयागराजमध्ये लागली आहे. विविध प्रकारचे साधू कुंभमध्ये सामील होत आहेत. मात्र एका साध्वीची चर्चा सध्या देशभर सुरु आहे. हर्षा रिछारिया असं या साध्वीचं नाव आहे. मात्र आता तिच्या साध्वी असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हर्षा रिछारिया हिचे व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तिच्याबद्दल वेगवेगळे दावे समोर येऊ लागले आहेत. हर्षाने सांगितले की ती 2 वर्षांपासून साध्वी आहे, त्यानंतर तिचे जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोकांनी दावा केला की तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. काही दिवसांपूर्वी तिने बँकॉकमध्ये एक शो होस्ट केल्याचा दावा देखील केला जात आहे.
हर्षाचं इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे नाव host_harsha असे आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या इन्स्टा अकाउंटच्या स्टोरी हायलाइटमध्ये एक रील दिसत आहे. ज्यामध्ये शो चे डिटेल्स आहे. ज्यात हर्षाच्या फोटोसह ती या कार्यक्रमाची होस्ट असल्याचा उल्लेख आहे. या इव्हेंटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे.
नक्की वाचा - Mahakumbh 2025 : स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेलना शिवलिंगाला स्पर्श का करू दिला नाही?
हर्षांचं स्पष्टीकरण
साध्वी असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर हर्षांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की, "मी साध्वी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मी अजून साध्वी झालेली नाही. साध्वी होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी माझे नाव साध्वी हर्षा ठेवले. मला सर्वात सुंदर साध्वी म्हटले जात असल्याचेही गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. हे सगळं पाहून बघून छान वाटतंय. मात्र आताच मला साध्वी संबोधणे योग्य नाही."
हर्षा रिछारिया कशी झाली व्हायरल?
महाकुंभाचा पहिल्या दिवशी (13 जानेवारी) निरंजनी आखाड्याच्या शोभा यात्रेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रथावर स्वार झालेल्या साध्वीची मुलाखत झाली. उत्तराखंडमधून आलेल्या हर्षा रिछारियाची ही मुलाखत होती. त्यावेळी हर्षाने सांगितलं की, ती सर्व काही सोडून इथे आली आहे. माझं वय 30 वर्ष असून मी मागील दोन वर्षांपासून साध्वी म्हणून जगत आहे.
नक्की वाचा - Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ, कधी होईल शाही स्नान?
हर्षाचा हा व्हिडीओ रातोरात ती इन्स्टाग्रावर व्हायरल झाला आणि रातोरात इन्स्टास्टार बनली. इन्स्टाग्राम ट्रॅकरच्या आकडेवारी नुसार, हर्षाचे 12 जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर 5 लाख 31 हजार फॉओअर्स होते. त्यानंतर हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 13 जानेवारीला तिचे एका दिवसात 3 लाख 28 हजार फॉलोअर्स वाढले. तर 14 जानेवारीला आतापर्यत तिचे 1 लाख 84 हजार फॉलोअर्स वाढले आहेत. सध्या इन्स्टाग्रामवर तिचे 10 लाख 44 हजार फॉलोअर्स आहेत.