Viral Video: भाजपच्या केंद्रीय मंत्र्यावर गाडीला धक्का मारण्याची वेळ, तवांगमध्ये नक्की काय घडलं? पाहा Video

"तवांगमध्ये निसर्ग कधीही आव्हान देऊ शकतो, अशा वेळी एकमेकांना मदत करणे हाच धर्म आहे," असं ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात सध्या निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याच वेळी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. स्वतःच्या 'एक्स' अकाऊंटवर त्यांनी एक व्हिडीओ  शेअर केला आहे. त्यात ते बर्फात फसलेली एक गाडी ढकलताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

तवांगसारख्या उंचावरील भागात हवामान कधी बदलेल याचा नेम नसतो. इथं सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साठले आहे. अशाच एका प्रसंगी बर्फाच्या जाड थरामुळे एक वाहन रस्त्यात अडकले होते. यावेळी मंत्र्यांनी केवळ पाहणी न करता स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून गाडीला धक्का दिला. "अशा कठीण हवामानात कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहणे आवश्यक आहे," असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Ajit Pawar: अजित पवारांच्या 'त्या' प्रकरणात मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, उच्च स्तरीय चौकशी होणार

यावेळी रिजिजू यांनी सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) तत्परतेचे विशेष कौतुक केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्ते मोकळे ठेवण्यासाठी BRO चे जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत. मंत्र्यांच्या या साधेपणाचे आणि 'ग्राउंड लेव्हल'वरील सक्रियतेचे नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. तवांगमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत हिमवृष्टी होत आहे. ज्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. अशा वेळी रिजिजू स्वत: रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. 

नक्की वाचा - Pune News: अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवा Video, मोठा स्फोट अन् एकच धावपळ

स्थानिकांसोबत मिळून त्यांनी गाडीला धक्का मारला. "तवांगमध्ये निसर्ग कधीही आव्हान देऊ शकतो, अशा वेळी एकमेकांना मदत करणे हाच धर्म आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत "असा असावा लोकप्रतिनिधी" अशा कमेंट्स केल्या आहेत. बर्फाची चादर पसरलेल्या रस्त्यावर मंत्र्यांची ही कृती पाहून अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत. BRO कडून सुरू असलेल्या बर्फ उपसण्याच्या कामाचीही त्यांनी यावेळी पाहणी केली.