- गुजरातच्या गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या जिपसमोर सिंहीणीने गायची थरारक शिकार केली
- सिंहीणीने पर्यटकांच्या वाहनाचा वापर करून गुप्तपणे दबा धरून गायवर झडप घातली होती
- शिकार करताना नर सिंहही तिथे दाखल झाला आणि दोघांनी मिळून गायीला संपवलं
Lion and Lioness Video: निसर्गाचा नियम हा अत्यंत क्रूर असतो. याचा प्रत्यय देणारी एक घटना गुजरातच्या गिर नॅशनल पार्कमध्ये घडली आहे. जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या जिप्सीसमोरच एका सिंहीणीने गायीची शिकार केली. या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. असं दृष्य आपण शक्यतो टीव्हीवर पाहातो. पण पर्यटक नशिबवान होते. त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर लाईव्ह शिकारीचा अनुभव घेता आला. पण त्याच वेळी त्यांच्या काळजाचा ठोका ही चुकला होता. कारण सिंहीण या पर्यटकांच्या जीप जवळच होती. त्यामुळे पुढे काय होईल हे त्यांना ही माहित नव्हतं. पण पुढे जे काही झालं ते त्यांच्यासाठी विस्मर्णीय ठरलं.
जिप्सीचा घेतला आधार
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक सिंहीण पर्यटकांच्या सफारी गाडीच्या मागे दबा धरून बसली होती. गाफील असलेली एक गाय समोरून येत होती. पुढे आपली शिकार होणार आहे याची तिला पुसटती ही कल्पना नव्हती. ते हुळहळु पुढे येत होते. तशी सिंहीण दबा धरत हळुहळु पुढे सरकत होती. जिप्सीच्या जवळ गाय येताच सिंहीणीने क्षणाचाही विलंब न लावता तिच्यावर झडप घातली. विशेष म्हणजे, सिंहीणीने स्वतःला लपवण्यासाठी पर्यटकांच्या वाहनाचा अत्यंत खुबीने वापर केला. पर्यटकांनी ही शिकार लाईव्ह अनुभवली. क्षणात सिंहीणीने त्या गायीचा फाडशा पाडला.
अंगावर काटा आणणारा क्षण
सिंहीणीने गायीचा गळा पकडल्यानंतर काही वेळातच तिथे एक नर सिंह देखील दाखल झाला. या दोन्ही हिंस्त्र प्राण्यांनी मिळून काही मिनिटांतच आपली शिकार फत्ते केली. आपल्या अगदी काही फूट अंतरावर सुरू असलेला हा मृत्यूचा थरार पाहून पर्यटकांची अक्षरशः दातखिळी बसली होती. काहींनी भीतीपोटी तर काहींनी कुतूहलापोटी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. निसर्गाचे हे रौद्र रूप पाहून सोशल मीडियावर 'निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच भीषण आहे', अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना हा क्षण अविस्मर्णीय असाच वाटला. अनेक वेळा प्रयत्न करूनही असं दृष्य पाहायला मिळत नाही. ते या पर्यटकांच्या नशिबात होतं.
कॅमेऱ्यात कैद झाली शिकार
गुजरातच्या गिर अभयारण्यातून हा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. येथे जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना चक्क 'लाईव्ह शिकार' पाहायला मिळाली. सिंहीणीने एका गायीवर हल्ला करून तिला यमसदनी धाडल्याचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना पर्यटकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. थोड्याच वेळात तिथे डरकाळी फोडत सिंहही आला आणि दोघांनी शिकार पूर्ण केली. पर्यटकांनी आपल्या जिप्सीतूनच हा थरार पाहिला. सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत असून, 'अशी शिकार जवळून पाहणे खरोखरच नशिबाचा आणि भीतीचा भाग आहे', असे नेटकरी म्हणत आहेत.
Viral Video Shows Lioness Hunting in Front of Tourists in Gujarat's Gir Forest
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) May 12, 2026
Priceless visuals for tourists pic.twitter.com/6uTW5twZXh
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world