देशात दारू पिणाऱ्यांची कमतरता नाही. जगातील सर्वाधिक दारू पिणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. त्यामुळे या कंपन्यांचं उत्पन्नही जास्त असतं. सर्वात मोठ्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य कंपन्यांपैकी एक असलेल्या रॅडिको खैतान लिमिटेडने गेल्या ९० दिवसांत आपला नफा दुप्पट केला आहे. रॅडिको खेतान लिमिटेडचा गेल्या आर्थिक वर्ष मार्चमध्ये पूर्ण झालेल्या त्रैमासिकादरम्यानचा नफा दुप्पट झाला आहे. हा आकडा १७९.४६ कोटींच्या घरात आहे. कंपनीने बीएसईला पाठवविलेल्या सूचनेत याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नफा झाला दुप्पट...
यापूर्वी गेल्या वर्षी या त्रैमासिकात कंपनीने ९३.०७ कोटींचा लाभ कमावला होता. कंपनीजवळ, रामपूर इंडियन सिंगल माल्ट व्हिस्की, जैसलमेर इंडियन क्राफ्ट जिन, मॅजिक मोमेट्स व्होडका आणि ८ पीएम सारखे ब्रँड्स आहेत. त्रैमासिकादरम्यान कंपनीचं परिचालन उत्पन्न १५.५ टक्क्यांनी वाढून ५,१८०.२३ कोटी रुपये झालं.
खर्चात झाली वाढ...
मार्च त्रैमासिकात रॅडिको खेतानची एकूण आयएमएफएलची (भारतीय बनावटीची विदेशी दारू) विक्री चार टक्क्यांनी वाढून ९५.२ लाख (७५० एमएलच्या १२ बाटल्या) झाली आहे. त्रैमासिकात कंपनीचा एकूण खर्च १३.५ टक्क्यांनी वाढून ४,९५५.४० कोटी झाला आहे. यादरम्यान, कंपनीचं अन्य उत्पन्नासह एकूण उत्पन्न ५.६३ टक्क्यांनी वाढून ५,१८८.१२ कोटी रुपये झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी रॅडिको खेतानचा निव्वळ नफा ७५ टक्क्यांच्या वाढीसह ६०४.४७ कोटी झाला आहे.
आर्थिक वर्षादरम्यान कंपनीचं एकूण उत्पन्न २२.७ टक्क्यांनी वाढून २०,९८८.२३ कोटी रुपये झाली. यादरम्यान एका स्वतंत्र नियामक फाइलिंगमध्ये, रॅडिको खैतानने म्हटलं आहे की, त्यांच्या संचालक मंडळाने २०२५-२६ साठी ४५० टक्के, म्हणजेच २ रुपये प्रति इक्विटी शेअरवर ९ रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world