जाहिरात

आता पेट्रोलचं टेन्शन संपणार! सरकार आणतंय नवं इंधन, काय आहे Flex Fuel? जुन्या गाडीत चालणार का?

जगात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियाई युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा डाव खेळायची तयारी केली आहे.

आता पेट्रोलचं टेन्शन संपणार! सरकार आणतंय नवं इंधन, काय आहे Flex Fuel? जुन्या गाडीत चालणार का?
Flex Fuel India Latest Update

What is Flex Fuel: जगात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियाई युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा डाव खेळायची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,सोमवारी पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी बैठक होणार आहे. यामध्ये फ्लेक्स फ्युअल (Flex Fuel)ला भारताच्या रस्त्यांवर उतरवण्यासाठी जोर लावण्यात येणार आहे. भारत त्यांच्या गरजेपेक्षा 85 टक्के कच्चा तेल परदेशातून खरेदी करतो. जेव्हाही मिडल इस्ट मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. जेव्हा तेलाच्या किंमती वाढतात आणि देशाच महागाईचा भडक उडतो.

सरकारने आधी 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचं टार्गेट 2030 पर्यंत ठेवलं होतं. ते आता 2025-26 केलं आहे. आता सोमवारी झालेल्या बैठकीत तेल कंपनी आणि ऑटोमोबाईल कंपनीसोबत E85 चा रोडमॅप बनवला जाईल. सरकारने इथेनॉलवर GST कमी करून 5 टक्के केलं होतं. ज्यामुळे याची किंमती वाढणार नाहीत.

फ्लेक्स फ्युअलचे फायदे 

कच्च्या तेलावरील अवलंबित्व संपल्याने इथेनॉलचा वापर वाढतो,ज्यामुळे अब्जो डॉलर्सची परदेशी चलनाची बचत होते. याशिवाय इथेनॉल उत्पादनासाठी सरकार ऊस,मका आणि भात यांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल.तसेच इथेनॉल जळताना कमी कार्बन उत्सर्जित करतो,म्हणजेच प्रदूषणातही घट होईल. पण हे ‘फ्लेक्स फ्युएल' नेमकं काय आहे? यामुळे पेट्रोलच्या किमती कमी होतील का? तुमची कार किंवा दुचाकी या फ्युएलवर चालू शकणार आहे का? जाणून घ्या.

नक्की वाचा >> Video: मोठं झाल्यावर रणवीर सिंग बनणार! शाळेच्या असाइनमेंटमध्ये मुलानं लिहिली मनातली गोष्ट, मॅडमही झाल्या थक्क

काय आहे फ्लेक्स फ्युअल?

फ्लेक्स म्हणजे फ्लेक्सिबल (Flexible).फ्लेक्स फ्युएल हे पेट्रोल आणि इथेनॉल यांचे मिश्रण असते. सध्या भारतात आपण E20 पेट्रोल वापरत आहोत,ज्यामध्ये 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल असतो.मात्र फ्लेक्स फ्युएलवर चालणाऱ्या गाड्या E85 पर्यंतच्या मिश्रणावर चालू शकतात,त्यामध्ये 85% इथेनॉल आणि फक्त 15% पेट्रोल असते. इथेनॉल ऊसाचा रस,मका आणि तांदूळ यापासून तयार केला जातो. या सर्व पिकांची शेती भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे इथेनॉल देशातच तयार होतो आणि त्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही.

जुन्या गाडीत हे इंधन चालेल का?

साध्या पेट्रोल इंजिन असलेल्या कार किंवा दुचाकीत 85% इथेनॉल (E85) वापरता येत नाही. त्यासाठी फ्लेक्स फ्युएल वाहनच आवश्यक असते. या गाड्यांच्या इंजिनमध्ये खास प्रकारचे सेन्सर्स असतात,जे वापरल्या जाणाऱ्या फ्युएलच्या मिश्रणानुसार इंजिन आपोआप अ‍ॅडजस्ट करतात.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com