जाहिरात

E85 Fuel: देशात लॉन्च झालं नवं इंधन, पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त मिळणार, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

सरकारने अधिकृतपणे E85 इंधन (Fuel) लॉन्च केलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे,नवं ब्लेंडेड फ्यूल सामान्य नागरिकांना दिलासा देणारं ठरणार आहे.

E85 Fuel:  देशात लॉन्च झालं नवं इंधन, पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त मिळणार, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
E85 Fuel vs Petrol latest News

E85 Fuel vs Petrol : मिडल इस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या टेन्शनमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमतीत उलथापालथ झाली आहे. याचदरम्यान भारताने एनर्जी सेफ्टीला मजबूत करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने अधिकृतपणे E85 इंधन (Fuel) लॉन्च केलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे,नवं ब्लेंडेड फ्यूल सामान्य नागरिकांना दिलासा देणारं ठरणार आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, E85 इंधन 20 रुपये प्रतिलिटर स्वस्त मिळेल. E85 इंधनचं एका अशा पेट्रोलसोबत मिश्रण आहे,ज्यामध्ये 85 टक्क्यांपर्यंत एथेनॉल मिसळलं जातं.

1.85 लाख कोटींची झाली बचत

मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय की, आतापर्यंत ब्लेंडेड फ्यूअलच्या माध्यमातून देशाने जवळपास 1.85 लाख कोटींची बचत केली आहे. मिडल इस्टच्या युद्धादरम्यान देशात इंधनाचा तुटवडा जाणवला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली उलथापालथ ग्राहकांवर फारशी परिणामकारक ठरली नाहीय.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'या' तारखेपासून 14 दिवस जमावबंदी, कोण कोणत्या गोष्टींवर असणार बंदी?

ग्राहकांना मिळणार नवं ऑप्शन

लॉन्चिंगवेळी मंत्री हरदीप पुरी ने म्हणाले की, E85 इंधनाच्या सुरुवातीपासूनच देशाला अनेक फायदे होतील. सर्वात आधी वाहनांमधून होणाऱ्या विषारी उत्सर्जनाचं प्रमाण कमी होईल.यामुळे शहरांची हवा स्वच्छ होईल. याशिवाय विदेशी कच्च्या तेलाच्या आयातीवर भारताचं अवलंबित्व खूप जास्त प्रमाणात नियंत्रणात राहील. तसच सामान्य नागरिकांचीही बचत होईल.

E85 साठी टोयाटाची विक्री सर्वात जास्त

हरदीप पुरी यांनी पुढे म्हटलंय की,अशाप्रकारच्या इंधनासाठी टोयोटाच्या गाड्या सर्वात जास्त वापर होणाऱ्या पर्यायांमध्ये समाविष्ट आहेत. आता तुमची गाडी कामाची राहिली नाही,असं नाही. त्यांच्यासाठी देशात पहिल्यासारखंच नॉर्मल फ्यूअल ऑपरेशनल राहिल.तसच हे इंधन पर्यावरणासाठीही अनुकूल राहील. 

नक्की वाचा >> Solapur News: सोलापूर रेल्वे स्थानकात मोठी दुर्घटना टळली, काही प्रवासी जखमी, नेमकं काय घडलं?

3 जूनला हिरो मोटोकॉर्पने देशात पहिली फ्लेक्स फ्यूअल वर चालणारी बाईक हिरो स्प्लेंडर प्लस लॉन्च केली होती.तर मारूतीने 4 जून रोजी त्यांची सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासू हॅचबॅक व्हॅगनआरला फ्लेक्स-फ्यूअलच्या रुपात सादर केलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com