Female Genital Mutilation :बोहरा मुस्लिमांमध्ये मुलींचा खतना का केला जातो? कोवळ्या वयातच घडणारी प्रथा काय आहे?

एका रिपोर्टनुसार, जगभरात आतापर्यंत तब्बल २० कोटी मुलींचा खतना करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Girl khatna in muslim traditions : जगभरातील अधिकांश देशांमध्ये महिलांना आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर अडचणीचा सामना करावा लागतो. इस्लाममधील खतना प्रथा त्यापैकी एक. प्रामुख्याने बोहरा मुस्लिमांमध्ये मुलींचा खतना (Female genital mutilation (FGM) केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या बाल कोश युनिसेफच्या (२०२०) एका रिपोर्टनुसार, जगभरात आतापर्यंत तब्बल २० कोटी मुलींचा खतना करण्यात आला आहे. यापैकी अधिकांश मुली इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशिया देशातील आहेत. या २० कोटींपैकी ४ कोटी ४० लाख मुलींचा खतना त्या १४ वर्षांहून कमी वयाच्या असताना करण्यात आला. ही प्रथा अधिकांश मुस्लीम बोहरा समाजात केला जातो. 


खतना प्रथा काय आहे? l what is Girl khatna in muslim traditions

इस्लामनुसार, खतना प्रथेनंतर महिला आपल्या पतीसाठी अधिक प्रामाणिक राहतात. असं मानलं जातं की, जर महिला सेक्समध्ये रुची ठेवत असतील तर हे चुकीचं आहे. तिला सेक्स एन्जॉय करण्याचा हक्क नाही. त्यामुळे खतना प्रथेच्या माध्यमातून महिलेचे प्रायव्हेट पार्ट कापला जातो. 

Advertisement

नक्की वाचा -Who are Bohra Muslims? : बोहरा मुस्लीम कोण आहेत? इतर मुस्लीम अन् बोहरांमध्ये फरक काय? खतना प्रथा काय आहे?


खतना कसा करतात? 

या प्रथेमध्ये लहान मुलींचे प्रायव्हेट पार्टचा काही अंश ब्लेडने कापला जातो. यादरम्यान मुलींना बेशुद्ध केलं जात नाही. काही महिला मुलीचे हात-पाय पकडतात आणि एक महिला मुलतानी मिट्टी लावून ब्लेडने प्रायव्हेट पार्टच्या समोरील (भगशिश्न) भाग ब्लेडने कापते. या प्रक्रियेनंतर मुलीला कित्येक महिने वेदना सहन कराव्या लागतात. काही प्रकरणात इन्फेक्शनमुळे मुलीचा मृत्यूही होतो. 


प्रकरण न्यायप्रविष्ठ....

२०२५ मध्ये एनजीओ चेतना वेलफेयर सोसायटीने सर्वोच्च न्यायालयात बोहरा मुस्लीम समाजातील खतना प्रथेविरोधात याचिका दाखल केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह कायदा आणि न्याय मंत्रालयाला नोटीस जारी करीत उत्तर मागितलं आहे. एनजीओ चेतना वेलफेयर सोसायटीने दावा केला आहे की, दाऊदी बोहरा समाजातील साधारण ७५ टक्के महिला आपल्या मुलींचा खतना करतात. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अनेक आफ्रिकी देशात एफजीएम म्हणजेच खतना करण्यावर प्रतिबंध आहेत. मात्र भारतात यावर निर्बंध आणण्यासाठी कोणताही कायदा नसल्याचं याचिकेत म्हटलं आहे. कुराणमध्ये या प्रथेचा कोणताही उल्लेख नाही, मात्र समुदायाचा विशेष ग्रंथ दैम-उल-इस्लाममध्ये याचं समर्थन करण्यात आलं आहे. जगभरातील अनेक इस्लामी विद्वान ही धार्मिक प्रथा मानत नाहीत. 

(वरील माहिती इंटरनेटवरील सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Advertisement