जाहिरात

Who are Bohra Muslims? : बोहरा मुस्लीम कोण आहेत? इतर मुस्लीम अन् बोहरांमध्ये फरक काय? खतना प्रथा काय आहे?

बोहरा हा शब्द गुजराती शब्द 'वोहरा' पासून आला आहे. ज्याचा अर्थ 'व्यवसाय' आहे. बोहरा समाज सर्वसाधारणपणे व्यवसायाशी जोडलेला असतो.

Who are Bohra Muslims? : बोहरा मुस्लीम कोण आहेत? इतर मुस्लीम अन् बोहरांमध्ये फरक काय? खतना प्रथा काय आहे?

Bohra Muslim community : बोहरा हा शब्द गुजराती शब्द 'वोहरा' पासून आला आहे. ज्याचा अर्थ 'व्यवसाय' आहे. बोहरा समाज सर्वसाधारणपणे व्यवसायाशी जोडलेला असतो. बोहरा मुस्लिमांची संख्या पाकिस्तान, अमेरिका, दुबई, यमन, इराकसह अनेक आखाती देशात पसरलेली आहे. बोहरा मुस्लीम आपल्या प्राचीन परंपरेशी जोडलेली असतात. हे लोक केवळ आपल्याच समाजात लग्न करतात. इतकच नाही तर त्यांच्या सवयीत अनेक हिंदू प्रथांचाही समावेश आहे. बोहरा समाजातील महिला सर्वसाधारणपणे शिक्षित असतात. या महिला व्यापारासह नोकरीही करतात. बोहरी समाजात महिलांनाही धार्मिक स्थळावर जाऊन प्रार्थना करण्याची परवानगी असते.  (Who are the  Bohra Muslims?)

बोहरा समाजाअंतर्गत अनेक उपशाखा येतात. यामध्ये प्रमुख आणि सर्वात मोठा म्हणजे दाऊदी बोहरा त्यानंतर सुलेमानी बोहरा, अलीया बोहरा, नजारी इस्मायली यांचा समावेश आहे. दाऊदी बोहरा समाजाच्या प्रमुखाला सय्यद्दना म्हटलं जातं. सद्यस्थितीत ५३ वे सय्यदना आहेत. त्याचं मुख्यालय मुंबईत आहे.  


बोहरा समाजाचा पोशाख... (Attire of the Bohra community...)

दाऊदी बोहरा समाजातील पोशाखही वेगळा असतो. पुरुष पारंपरिकपणे तीन भागांचा पांढरा पोशाख घालतात. ज्यामध्ये एक अंगरखा, एक ओव्हरकोट आणि पँट किंवा पायजमा असतो ज्याला इजार म्हणतात. पुरुष पांढऱ्या किंवा सोनेरी रंगाची टोपी घालतात. ज्यामध्ये सोनेरी किंवा पांढऱ्या रंगाच्या धाग्यांचा वापर करतात. बोहरा समाजातील पुरुषांकड़ून पैंगबर मुहम्मद यांच्या प्रथेनुसार, पूर्ण दाढी वाढवणं अपेक्षित असतं. बोहरा समाजातील महिला दोन भागांमध्ये पोशाख करतात. त्या रिदा नावाचा दुहेरी झगा घालतात. जो हिजाबपेक्षा वेगळा असतो. रिदा हा प्रकार त्याच्या रंगासाठी, त्यावरील नक्षीकामासाठी आणि लेससाठी ओळखला जातो. त्यांच्या पोशाखात महिलेचा चेहरा पूर्णपणे झाकला जात नाही. हा पोशाख काळ्या रंगाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगाचा असू शकतो. त्याला पर्डी नावाची एक लहान पट्टी असते, जी सहसा स्त्रीचा चेहरा दिसण्यासाठी एका बाजूला दुमडली जाते. परंतु गरज पडल्यास ती चेहऱ्यावरही घालता येते.

नक्की वाचा - Shia and Sunni Muslims Difference : शिया आणि सुन्नी मुस्लीमांमध्ये काय आहे फरक? दोघांमध्ये इतकं शत्रूत्व का?

खतनाची अमानवीय प्रथा... (khatna in muslim tradition)

बोहरा मुस्लीम समाजातील महिलांमध्ये खतन्याची एक अशी प्रथा आहे, ज्यामुळे या समाजात दोन गट पडले आहेत. बोहरा महिलांमधील एक मोठा गट याला अमानवीय म्हणतो. या प्रथेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. ही प्रथा म्हणजे महिलांचा संविधानाच्या अधिकाराचं उल्लंघन म्हटलं जातं. फिमेल जेनिटल म्यूटिलेशन किंवा बोहरा भाषेत 'खफ्ज' प्रकारात मुली सात वर्षांच्या झाल्यावर त्यांचे भगशिश्न कापले जाते. यामुळे त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण मिळवता येते, असा विश्वास आहे. ही प्रथा महिलांसाठी अत्यंत वेदनादायी असते. 

भारतात बोहरा समाजाचं आगमन...

११ व्या शतकात मुस्तली पंथ धर्मप्रसारकांच्या माध्यमातून भारतात आला. १५३९ नंतर जेव्हा भारतात हा समाज वाढला, त्यानंतर या पंथाचं मुख्यालय येमेनमधून भारतातील सिधपूर (गुजरातमध्ये) येथे हलवण्यात आलं. त्यानंतर १५८८ मध्ये बोहरा समुदाय दाऊद बिन कुतुब शाह आणि सुलेमान यांच्या अनुयायांमुळे बोहरा समाज विभागला गेला. त्यावेळी त्यांच्या धार्मिक तत्त्वांमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण फरक नव्हता.

दाऊदी बोहरा शियांचे आदर्श मानतात. जे प्रामुख्याने सुरत, जामनगर, राजकोट, अहमदाबाद, गुजरातमधील दाहोद आणि महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, राजस्थानचे उदयपूर, भिलवाडा आणि मध्य प्रदेशातील उज्जैन, इंदूर, शाजापूर या शहरांमध्ये राहतात. दाऊदी बोहरा सर्वात आधी मुंबईत आले होते. तर येमेन आणि सौदी अरबमध्ये बोहरा मुस्लीम समुदाची संख्या मोठी आहे. 

दाऊदी बोहरा मुस्लिमांचा वारसा

दाऊदी बोहरा वारसा फातिमी इमामांशी संबंधित आहे. ज्यांना पैगंबर मोहम्मद यांचे थेट वंशज मानले जाते. १० व्या ते १२ व्या शतकापर्यंत जगभरात राज्य करत असताना इस्लामने ज्ञान, विज्ञान, वास्तुकला, कला, साहित्य आणि इतर अनेक गोष्टी मिळवित इस्लाम धर्माला समृद्ध केलं आहे. जे आज मानवी संस्कृतीसाठी एक मौल्यवान संपत्ती आहे.

दाऊदी बोहरा समाज इमामांच्या आदेशांचे पालन करतात. बोहरा समाजाचे २१ वे आणि शेवटचे इमाम तय्यब अबुल कासिम होते. त्यांच्या नंतर, ११३२ मध्ये आध्यात्मिक नेत्यांची परंपरा सुरू झाली. बोहरा समाजाची सुफी आणि दर्ग्यांवर अढळ श्रद्धा आहे. दाऊदी बोहरा समाज हा इस्माईली शिया समाजाची एक उप-शाखा आहे.

(येथे दिलेली माहिती केवळ समजुती आणि माहितीवर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com