जाहिरात

Imposter Syndrom : इंपोस्टर सिंड्रोम काय आहे? विराट कोहलीचा संघर्ष; तज्ज्ञांकडून जाणून घेऊया या सिंड्रोमविषयी

क्रिकेटर विराट कोहलीने आपल्या करिअरबाबत भावनिक खुलासा केला आहे. कोहलीने सांगितलं की, बऱ्याच काळापासून तो इंपोस्टर सिंड्रोमशी संघर्ष करीत होता.

Imposter Syndrom : इंपोस्टर सिंड्रोम काय आहे? विराट कोहलीचा संघर्ष; तज्ज्ञांकडून जाणून घेऊया या सिंड्रोमविषयी

What is Imposter Syndrome? : क्रिकेटर विराट कोहलीने आपल्या करिअरबाबत भावनिक खुलासा केला आहे. कोहलीने सांगितलं की, बऱ्याच काळापासून तो इंपोस्टर सिंड्रोमशी संघर्ष करीत होता. विराटने सांगितलं की, टीमचा कर्णधार असताना तो मानसिकदृष्ट्या थकला होता. यादरम्यान तो मानसिक ड्रेन झाला होता. क्रिकेट खेळण्याचा खरा आनंद जणू गायब झाला होता. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया इंपोस्टर सिंड्रोम काय आहे.

इंपोस्टर सिंड्रोम काय आहे?

इंपोस्टर सिंड्रोल एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये लोक यशस्वी झाल्यानंतर स्वत:ला फ्रॉड समजू लागतात. हा कोणताही आजार नाही तर एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये यश केवळ एक योगायोग असल्याचं व्यक्तीला वाटतं. या स्थितीत व्यक्तीला स्वत:विषयी शंका वाटते. मानवी मन आपल्याला ढोंगी असल्याची जाणीव करून देते. या अवस्थेत, लोक स्वतःला कमी लेखतात. केवळ विराट कोहलीच नाही, तर अल्बर्ट आईनस्टाईन आणि टॉम हँक्स यांसारख्या महान व्यक्तींनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे.

इंपोस्टर सिंड्रोमची लक्षणं काय आहेत?

  • चांगलं काम करणं, मात्र त्याचं श्रेय न घेणं
  • अपयशाची भीती वाटणे
  • दुसऱ्याशी तुलना करणे
  • प्रत्येकवेळी खूप मेहनत करणे
  • आत्मविश्वासाची कमतरता
  • नकारात्मक आत्म-मूल्यांकन
  • अति काम करून स्वतःला थकवून टाकणं
  • यश आल्यानंतर त्याचा अस्वीकार करणे

इम्पोस्टर सिंड्रोम हा एक विकार नाही..

तज्ज्ञांच्या मते, इम्पोस्टर सिंड्रोम हा क्लीनिकल ​​विकार नाही. कठोर वातावरण मुलांमध्ये अशा प्रकारची मानसिक स्थितीला कारणीभूत ठरू शकते. विद्यार्थी आणि व्यावसायिकांना या सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

नक्की वाचा - Virat Kohli : 'त्या' जागी मी एक सेकंदही थांबणार नाही; 2027 वर्ल्ड कपच्या आधीच विराट कोहलीचा स्पष्ट मेसेज

हा सिंड्रोम बरा होऊ शकतो का?

या सिंड्रोममधून बाहेर जाण्यासाठी सेल्फ टॉक अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही स्वत:शी बोलून चूक आणि बरोबर ओळखू शकता. याशिवाय तुम्ही थेरेपीची मदत घेऊ शकता. प्रत्येक कामात तुम्ही परफेक्ट असू शकत नाही. चुका हे अपयशाचे लक्षण नाही तर चुकांमधून व्यक्ती शिकते. तुलना करण्याची सवय बदला. सोशल मिडिया किंवा ऑफिसमधील दुसऱ्यांशी तुलना केल्याने इंपोस्टर सिंड्रोम वाढू शकतो. आपल्या मेहनतीला श्रेय द्या. यश नशीबाने नव्हे तर मेहनतीचं फळ आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com