मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरूण मंत्र्याचे वय किती? तर सर्वाधिक वयाचा मंत्री कोण?

मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वात तरूण चेहरा कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. शिवाय सर्वात वयोवृद्ध मंत्री कोण यांचीही चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. यात भाजपसह मित्रपक्षांचे जवळपास 50 मंत्री शपथ घेत आहेत. त्यात सर्वाधिक मंत्री हे भाजपचे आहेत. तर चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसमचे दोन आणि जनता दल (यु) चे दोन खासदार मंत्रीपदाची शपथ घेतली. अन्य मित्रपक्षांच्या वाट्याला एक एक मंत्रीपद आले आहे. या मंत्रिमंडळात सर्वात तरूण चेहरा कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. शिवाय सर्वात वयोवृद्ध मंत्री कोण यांचीही चर्चा सुरू झाली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वात कमी वयाचे मंत्री आहेत राम मोहन नायडू. तर सर्वाधिक वय हे बिहारच्या जितमराम मांझी यांचे आहे. 

हेही वाचा -  Modi 3.0 : माजी IPS अधिकारी, तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष; राज्याचा 'सिंघम' घेणार मंत्रिपदाची शपथ 

कोण आहेत राम मोहन नायडू? 

राम मोहन नायडू हे तेलगू देसम पार्टीचे खासदार आहेत. ते आंध्र प्रदेशच्या श्रीकाकूलम लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. ते माजी मंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे नेते येरेन नायडू यांचे पुत्र आहेत. नायडू यांनीही केंद्रात मंत्री पद भूषवले आहे. शिवाय ते ही सर्वात कमी वयाचे मंत्री होते. त्याचीच री त्यांच्या मुलानेही ओढली आहे. राम  मोहन यांचा जन्म 18 डिसेंबर 1987 साली झाला आहे. 2014 साली वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढली. त्यात त्यांनी विजयाची नोंद केली. 2012 साली त्यांचा वडिलांचा कार अपघातात निधन झाले. त्यावेळी राम मोहन हे परदेशात होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राम मोहन हे चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्या जवळचा मानला जातो. चंद्राबाबू नायडू यांना अटक झाल्यानंतर दिल्लीतला मोर्चा राम मोहन यांनीच सांभाळला होता. दरम्यान या लोकसभा निवडणुकीत राम मोहन यांनी जवळपास 3 लाख 27 हजाराच्या फरकाने विजय मिळवला आहे. राम मोहन यांचे सध्या वय 36 वर्षाचे आहेत. त्यामुळे ते मोदी मंत्रिमंडळातील सर्वात तरूण मंत्री ठरले आहे.  

Advertisement

हेही वाचा -  Modi 3.O : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गजांचा पत्ता कट

जीतन राम मांझी सर्वात वयोवृद्ध मंत्री 

जीतन राम मांझी हे वयाच्या 80 व्या वर्षी मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होणार आहेत. ते मोदी मंत्रीमंडळातील सर्वात वयोवृद्ध मंत्री असणार आहेत. मांझी हे पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आले आहेत. या आधी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. गया लोकसभा मतदार संघातून जीतन राम मांझी विजयी झाले आहेत. त्यांनी आरजेडी उमेदवाराचा एक लाखा पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. मोदी मंत्रिमंडळातील ते सर्वात जास्त वयाचे मंत्री असणार आहेत. जीतन राम मांझी हे हिंदुस्तानी आमाव मोर्चा या पक्षाचे अध्यक्ष आहे. त्यांना नितीश कुमार यांचे जवळचे मानले जातात.   

Advertisement

हेही वाचा -  स्मृती इराणी यांना पराभवानंतरही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार?

रक्षा खडसेही वयाने लहान असलेल्या मंत्री 

तेलगू देसमच्या राम मोहन नायडू हे वयाने सर्वात लहान असलेले मंत्री असणार आहेत. त्यांच्या खालोखाल भाजपच्या रक्षा खडसे यांचा क्रमांक लागतो. त्यांचा जन्म 13 मे 1987 साली झालाय. रक्षा खडसे यांचे सध्याचे वय 36 वर्षांचे आहे. मात्र त्या राम मोहन यांच्या पेक्षा सात महिन्याने मोठ्या आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात कमी वयानुसार दुसरा क्रमांक लागतो. रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्या आहेत.   

Advertisement

Topics mentioned in this article