जाहिरात
Story ProgressBack

स्मृती इराणी यांना पराभवानंतरही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार?

2019 च्या लोकसभा निवडणुकीतअमेठीमधून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र स्मृती इराणी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Time: 2 mins
स्मृती इराणी यांना पराभवानंतरही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार?

नरेंद्र मोदी आज (9 जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत आज काही नेते देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. एनडीए सरकारमध्ये माजी मंत्री स्मृती इराणी यांना पुन्हा संधी मिळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण 2014 साली पराभवानंतरही स्मृती इराणी यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीतअमेठीमधून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र स्मृती इराणी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसच्या किशोरीलाल  शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा 1 लाख 67 हजार 196 मतांना पराभव केला. त्यामुळे सध्या स्मृती इराणी यांचा मंत्रिपदाचा मार्ग अवघड आहे. 

(नक्की वाचा- Modi Cabinet : नरेंद्र मोदींसोबत आज कोणते नेते घेणार शपथ? नावांची यादी आली समोर)

पहिल्या टप्प्यात स्मृती इराणी यांना मंत्रिपद मिळेल, याची शक्यता फारच कमी आहे. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळाली तर मिळू शकते. मात्र त्यासाठी स्मृती इराणी यांना राज्यसभेवर संधी द्यावी लागेल.

स्मृती इराणी यांची कारकीर्द

'कहानी घर घर की' या सीरियलमुळे स्मृती इराणी यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. दरम्यान 2003 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतून त्यांनी भाजपकडून कपिल सिब्बल यांच्याविरोधात निवडणूक देखील लढवली होती. ज्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. 2011 मध्ये गुजरातमधून त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आणि त्या खासदार बनल्या. 

(वाचा - मोदींच्या मंत्रिमंडळातील 'वजनदार' मंत्री नितीन गडकरी, तिसऱ्यांदा घेणार शपथ)

2014 साली त्यांना अमेठीतून तिकीट देण्यात आलं. त्यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र तरीही त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. मनुष्यबळ विकाम मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. नंतर त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची दबाबदारी देण्यात आली. 

(वाचा- मोदी 3.0 : आई-वडीलही निष्ठावंत, 35 वर्षे भाजपसोबत; पीयुष गोयल घेणार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ  )

2019 मध्ये अमेठीतून विजय

2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने स्मृती इराणी यांच्यावर विश्वास दाखवला. यावेळी स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. मात्र यंदाच्या निवडणुकीत स्मृती इराणी यांना अमेठीच्या जनतेने नाकारले आणि मोठा फरकाने त्यांचा पराभव झाला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Modi 3.0: पहिल्यांदाच खासदार अन् थेट केंद्रात लॉटरी, पुण्याचे मोहोळ मंत्री होणार
स्मृती इराणी यांना पराभवानंतरही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार?
Who is Suresh Gopi who opened BJP account in Kerala? narendra-modi-swearing-in-ceremony-2024
Next Article
Modi 3.0: केरळमध्ये भाजपचे खाते उघडले, सुरेश गोपींना थेट मिळाले मंत्रिपद
;