जाहिरात

जीवघेण्या उष्णतेचा महाधोका! Uncompensable Heat Stress ठरणार मृत्यूचे कारण? संशोधकांचा धडकी भरवणारा खुलासा

Uncompensable Heat Stress: भारतात 'अनकंपेन्सेबल हीट स्ट्रेस'ची टांगती तलवार. यामुळे मान्सूनच्या काळातही 60 टक्क्यांपर्यंत देश जीवघेण्या उष्णतेच्या विळख्यात येईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे

जीवघेण्या उष्णतेचा महाधोका! Uncompensable Heat Stress ठरणार मृत्यूचे कारण? संशोधकांचा धडकी भरवणारा खुलासा
"Uncompensable Heat Stress: भारतात 'अनकंपेन्सेबल हीट स्ट्रेस'ची टांगती तलवार"
प्रतिकात्मक फोटो Canva
  • भारतात जागतिक तापमान 2 अंश सेल्सिअसनी वाढल्यास मान्सूनमध्ये दमट आणि उष्णतेचा प्रचंड ताण वाढेल
  • अनकंपेन्सेबल हीट स्ट्रेसमुळे मानवी शरीर घाम गाळून स्वतःला थंड ठेवू शकत नाही आणि आरोग्य धोक्यात येते
  • 1979-2021 दरम्यान भारतात असह्य उष्णतेच्या घटनांमध्ये वाढ
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Uncompensable Heat Stress: जर जागतिक तापमान आणखी 2 अंश सेल्सिअसने वाढले (global warming of 2 degrees Celsius), तर भारतात मान्सूनच्या काळात पडणारा प्रचंड दमटपणा आणि उष्णतेमुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढतील. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात होणाऱ्या जीवघेण्या आणि असह्य उष्णतेचा प्रभाव अधिक काळ टिकून राहील, या परिस्थितीस 'अनकंपेन्सेबल हीट स्ट्रेस' (UHS- असह्य उष्णतेचा ताण) (uncompensable heat stress) असे म्हटले जाते. एका संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

...तर मोठी आव्हाने निर्माण होऊ शकतात

"अमेरिकन जिओफिजिकल युनियन (एजीयू) ॲडव्हान्सेस" नावाच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षामध्ये "मान्सूनच्या काळात (जुलै-ऑक्टोबर) निर्माण होणाऱ्या असह्य उष्णतेच्या प्रकोप" या मुद्यावर भर देण्यात आला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगर, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड आणि पर्ड्यू विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, उन्हाळा आणि मान्सून या दोन्ही ऋतूंमध्ये दीर्घकाळ टिकणारा असह्य 'हीट स्ट्रेस' (Heat Stress) हा दाट लोकवस्तीच्या आणि संवेदनशील भागातील सार्वजनिक आरोग्य, कामगारांची उत्पादकता आणि हवामानातील लवचिकता (क्लायमेट रेझिलियन्स) यासाठी मोठी आव्हाने उभी करू शकतो.

'अनकंपेन्सेबल हीट स्ट्रेस' म्हणजे काय? | What Is Uncompensable Heat Stress

Uncompensable Heat Stress ची स्थिती तेव्हा निर्माण होते, जेव्हा अतिशय जास्त उष्णता आणि हवेतील आर्द्रतेमुळे (दमटपणामुळे) मानवी शरीर घाम गाळून किंवा इतर कोणत्याही मार्गाने स्वतःला थंड ठेवू शकत नाही. सतत अशा प्रकारची उष्णता राहिल्याने मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामध्ये उष्णतेशी संबंधित आजार, अवयव निकामी आणि मृत्यू होण्याचा धोका अशा गोष्टींचा समावेश आहे. या संशोधनातून असे दिसून आले आहे की, 1979-2021 या कालावधीत, असंतुलित पातळीवर यूएचएसच्या (uncompensable heat stress) घटना अनेकदा घडल्या आहेत आणि याचा परिणाम देशभरातील बहुतांश भागांवर होत आहे.

(नक्की वाचा : Phone Overheating: उन्हाळ्यात स्मार्टफोन भट्टीसारखा गरम होतोय? आधी 4 गोष्टी करा, अन्यथा थेट बॅटरीचा होईल स्फोट)

'हीट स्ट्रेस' ठरणार मृत्यूचे कारण?

अनकंपेन्सबल हीट स्ट्रेसची (uncompensable heat stress) ही स्थिती मार्च ते जून या उन्हाळ्याच्या महिन्यांत जास्त प्रमाणात पाहायला मिळाली, ज्याचा फटका भारताच्या आठ टक्के भागाला बसला आणि ही स्थिती दरवर्षी उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रकरणांशीही जोडलेली होती.

(नक्की वाचा : Weather Alert: बापरे! 15 जूनपर्यंत चिंता कायम, उष्णतेची लाट की पावसाचा दिलासा? शेतकरी,सामान्यांसाठी मोठा इशारा)

संशोधकांनी लिहिले आहे की,"दमटपणा असलेली ही धोकादायक उष्णता अत्यंत वेगाने वाढेल. जर जगाचे तापमान औद्योगिक कालखंडापूर्वीच्या तुलनेत आणखी दोन अंशांनी वाढले तर मान्सूनमधील ही उष्णता देशातील जवळपास तेवढ्याच मोठ्या भागाला त्रासदायक ठरेल, जेवढा परिणाम उन्हाळ्याच्या दिवसांत होतो. त्या काळात देशातील 60 टक्के भाग उन्हाळ्यात आणि 53 टक्के भाग मान्सूनमध्ये या धोकादायक उष्णतेच्या विळख्यात असेल."

(Content Source PTI)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com