जाहिरात

Samosa History : सामोसा मूळचा भारतीय नाही, भारतात कसा पोहोचला? मुस्लीम देशाशी आहे कनेक्शन

आरोग्य मंत्रालयाने घेतलेला निर्णय अनेक सामोसा प्रेमींना धक्का देणारा असला तरी बटाट्याच्या चविष्ट सारणाने भरलेला खुसखुशीत सामोसा पाहिला तर स्वत:ला आवर घालणं कठीण आहे हे नक्की.

Samosa History : सामोसा मूळचा भारतीय नाही, भारतात कसा पोहोचला? मुस्लीम देशाशी आहे कनेक्शन

सध्या सामोसा आणि गुलाबजाम देशात चर्चेचा विषय ठरत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सामोसा आणि गुलाबजाम या खाद्यपदार्थांबाबत अलर्ट जारी करण्यात आलंय. अतिरिक्त तेल आणि साखरेचा वापर केलेल्या या पदार्थांमुळे आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याचं सांगत याची विक्री करणाऱ्या दुकानांबाहेर फलक लावण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Samosa Gulab Jam is as dangerous as cigarettes)

ही बातमी अनेक सामोसा प्रेमींना धक्का देणारी असली तरी बटाट्याच्या चविष्ट सारणाने भरलेला खुसखुशीत सामोसा पाहिला तर स्वत:ला आवर घालणं कठीण आहे हे नक्की. मात्र हा सामोसा मूळचा कुठलाय हे माहिती आहे का? सामोसा हा भारतीय नाही, असं सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. जाणून घेऊया सामोस्याचा इतिहास...

Gulab jam and jalebi : सामोसा आणि जिलबी सिगारेट इतके धोकादायक; AIIMS च्या आदेशानंतर नागपुरात इशारा देणारे फलक

नक्की वाचा - Gulab jam and jalebi : सामोसा आणि जिलबी सिगारेट इतके धोकादायक; AIIMS च्या आदेशानंतर नागपुरात इशारा देणारे फलक

सामोसा मूळचा कुठल्या देशातला? (Where does samosa originate from)

सामोस्याला भारतात येण्यासाठी मोठं अंतर पार करावं लागलंय. सामोसा इराणच्या प्राचीन साम्राज्यातून भारतापर्यंत पोहोचला आहे. त्यावेळी सामोस्याला फारसी शब्द संबूसाग नावाने ओळखलं जात होतं. याच शब्दावरुन याला सामोसा हे नाव पडलं. सामोस्याचा उल्लेख पहिल्यांदा अकराव्या शतकात इराणी इतिहासकार अबुल फजल बेहाकीने तारीख ए बेहाकी या पुस्तकात केला होता. त्यांनी गजनबी साम्राज्यात शाही दरबारमध्ये सादर केल्या जाणाऱ्या नमकीन पदार्थांचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये खिमा आणि ड्रायफ्रूटने भरलेला सामोसा होता. ज्यानुसार सामोसा साधारण दहाव्या शतकात मध्य पूर्व आशियात तयार केला जात होता. सामोसा जेव्हा पहिल्यांदा भारतात आला त्यावेळी यात बटाट्याचं सारण नव्हतं आणि तो तळलाही जात नव्हता. त्यावेळी सामोस्यात मांस भरून याला आगीवर भाजलं जात होतं. 

भारतात कसा पोहोचला सामोसा..? (When did samosa reach India)

13-14 व्या शतकात मध्य पूर्व आशियातून व्यापारी आणि मुस्लीम आक्रमक भारतात आले आणि त्यांच्यासोबत सामोस्याचीही भारतात एन्ट्री झाली. अमीर खुसरो आणि इब्न बतूतासारख्या प्रसिद्ध लेखकांनीही आपल्या लेखांमध्ये सामोस्याचा उल्लेख केला आहे. दिल्ली सल्तनतच्या अबुल फजलने आईन ए अकबरी लिहिताना शाही पदार्थांमध्ये सामोस्याचा समावेश केला आहे. त्यानंतर इब्न बतुता यांनीही जगभरात सामोस्याचा प्रचार केला.त्यानंतर १७ व्या शतकात पोतुर्गाल भारतात आले तेव्हा सोबत बटाटे घेऊन आले. यानंतर बटाट्याचं सारण घातलेला सामोस्याला सुरुवात झाली. सामोसा भारता आल्यानंतर वेळ आणि ठिकाणानुसार त्यात अनेक बदल झाले. 


  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com