
Maharashtra Rain News : गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नवरात्रौत्सवात पाऊस काही दिवस उसंत घेईल अशी अपेक्षा असताना दररोज पावसाने गरब्यात हजेरी लावली. त्यामुळे गरबा प्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. कमी दाब प्रणाली गुजरातकडे सरकून जाताच राज्यात पावसाचा ओसरणार आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील (Today 30 Sep Rain Update) पाऊस परतीच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान विभागाकडून आज (30 सप्टेंबर) मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगराला कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज गरबा प्रेमींना आनंदात गरबा खेळता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील इतर भागात कसा असेल पाऊस?
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Punjabrao Dakh Vs IMD : राज्यात पावसाची बॅटिंग सुरूच! पंजाबराव डख आणि IMD चा अंदाज काय?
हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी होणार असल्याचे संकेत आहेत. १ ऑक्टोबर आणि २ ऑक्टोबरलाही कोकणातील काही पट्टा सोडता इतर भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दोन्ही दिवसात मुंबई, ठाणे आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मराठवाड्यात कशी असेल स्थिती?
गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पावसामुळे मराठवाड्यात हाहाकार पाहायला मिळतोय. अशात आज पासून पुढील तीन दिवस मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. 3 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना अलर्ट देखील देण्यात आला आहे. दरम्यान कोणत्या जिल्ह्याला कोणत्या दिवशी कोणता अलर्ट देण्यात आला आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून
३० सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याला यलो अलर्ट
१ सप्टेंबर रोजी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याना यलो अलर्ट
२ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोलो, नांदेड आणि लातूर या जिल्ह्याना यलो अलर्ट
३ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नुकसान अपडेट
दोन दिवसात मराठवाड्यात एकूण ९६.६०मि.मी. पर्जन्यमान झालेले असून एकूण ३३० मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून, त्यामुळे ०७ व्यक्ती आणि २८३ जनावरे मयत झालेली असून १२७२ घरांचे नुकसान झालेले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world