भारतीय राजकारणातील Noob कोण? मोदींनी गेमर्सला दिलं असं उत्तर

PM Modi : नवखा किंवा खेळामध्ये पारंगत नसलेल्या व्यक्तीबाबत नूब (Noob) हा शब्द वापरला जातो.

जाहिरात
Read Time: 2 mins

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली देशातील प्रमुख गेमर्सशी चर्चा

नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील प्रमुख गेमर्सची आज (शनिवार) चर्चा केली. त्यावेळी त्यांनी 'नूब' Noob या शब्दाचा आधार घेत विरोधी पक्षाला टोमणा लगावला. नवखा किंवा खेळामध्ये पारंगत नसलेल्या व्यक्तीबाबत नूब हा शब्द वापरला जातो. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, 'निवडणूक सभेत मी नूब शब्दाचा वापर केला तर तुम्ही म्हणाल मी हे कुणाबद्दल बोलतोय... मी जर सांगितलं तर तुम्ही एका विशेष व्यक्तीबाबत मी बोलत आहे, असं म्हणालं.' मोदींच्या या वक्तव्यानंतर गेमर्सना हसू आवरलं नाही. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. मोदींनी नूब शब्दाचा उल्लेख करत कुणाचंही नाव घेतलं नाही, त्यानंतरही काँग्रेस नेते प्रतिक्रिया का देत आहेत? असा टोला भाजपा नेते शहजाद पूनावाला यांनी विचारला आहे. तर, कंगना रनौतनंही हा व्हिडीओ शेअर करत नूब कोण आहे? असा प्रश्न विचारलाय. 

पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात गेमिंग उद्योगाच्या भविष्यावर चर्चा केली. देशातील गेमर्सपुढील आगामी काळातील आव्हानं तसंच कौशल्य प्रधान गेम्स आणि कमाई मिळवून देणारे गेम्स यामधील अंतर काय आहे हे देखील जाणून घेतलं. तसंच या विषयावर स्वत:चं मत व्यक्त करताना व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाबाबतही काळजी व्यक्त केली. 
 

Advertisement

पंतप्रधान मोदींनी नमन माथूर Mortal), अनिमेष अग्रवाल (Thug), अंशू बिशू (Gamerfleet), गणेश गंगाधर (SKroosi), तीर्थ मेहता (Gcttirth), पायल धरे (Payal Gaming) आणि मिथिलेश पाटणकर (MythPat) या सात गेमर्सची चर्चा केली. 

26 वर्षांच्या तरुणामुळे भाजपाचं मिशन धोक्यात

पंतप्रधांनी यावेळी जीटीजी (गॉट टू गो), एएफके (अवे फ्रॉम कीबोर्ड) या गेमिंग संज्ञा देखील समजून घेतल्या. त्याचा उपयोग क्रिएटर्सकडून लाईव्ह-स्ट्रिमिंगच्या दरम्यान केला जातो. 
 

Advertisement
Topics mentioned in this article