
NIA chief Sadanand Date : 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा हा लवकरच भारतात दाखल होणार आहे. मुंबई हल्ल्याचा आरोपी आणि पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर राहिलेल्या राणाला अमेरिकेतून भारतात आणलं जात आहे. दरम्यान भारतातील त्याच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतात आल्यानंतर एनआयएकडून (NIA) तहव्वूर राणाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. अमेरिकेतून भारतात आणत एनआयएच्या ताब्यात चौकशी करण्याची मोठी जबाबदारी एनआयएचे प्रमुख आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी, मराठमोळे सदानंद दाते यांच्याकडे असेल. राणाची जबाबदारी घेणारे विद्यमान एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंनी 26/11 चा दहशतवादी हल्ला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या वेदना जवळून पाहिल्या आहेत. दातेंनी या हल्ल्यात अनेकांचा जीवही वाचवला होता.
नक्की वाचा - Tahawwur Rana: तहव्वुर राणा भारतात येण्याआधीच पाकिस्तानची झोप उडाली, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं...
कोण आहेत एनआयए प्रमुख सदानंद दाते?
सदानंद दाते 1990 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे सीनियर आयपीएस अधिकारी आहेत. दातेंचं नाव देशातील धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये घेतलं जातं. त्यांनी मुंबईतील 26/11 हल्ल्यावेळी दाखविलेलं शौर्य आणि माणुसकीचं देशभरातून कौतुक करण्यात आलं. सदानंद दाते यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये सेवा दिली आहे आणि वेळो-वेळी एनआयए आणि केंद्रीय एजन्सीमध्येही जबाबदारी स्वीकारली आहे.
सदानंद दाते दहशतवाद्यांशी लढले..
26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातून आलेल्या लश्कर-ए-तोय्यबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. तेव्हा सदानंद दाते मुंबई क्राइम ब्रान्चमध्ये कार्यरत होते. पाकिस्तानी दहशतवादी कामा रुग्णालयाजवळ असल्याची माहिती मिळताच दाते एक छोटी टीम घेऊन कामामध्ये पोहोचले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दातेंनी शौर्याने लढत दिली. त्यावेळी त्यांच्याकडे संसाधनंही कमी होती. यादरम्यान ते गंभीर जखमी झाले. मात्र त्यांनी रुग्णालयातील अनेक कर्मचारी आणि रुग्णांचा जीव वाचवला. सदानंद दाते यांना त्यांच्या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदक गॅलेंट्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world