शांततेत काम, अमित शाहांचे निकटवर्तीय, पश्चिम बंगालमधील 'भाजपचे शिल्पकार'; कोण आहेत सुनील बन्सल?   

५७ वर्षीय सुनील बन्सल पडद्याच्या मागे राहून काम करणारे खेळाडू आहेत. मीडियाच्या चर्चेपासून दूर असलेले बन्सल हे शांतपणे संघटनेचं काम करीत होते. 

जाहिरात
Read Time: 3 mins
भाजप नेता सुनील बन्सल (फाइल फोटो)

Who is Sunil Bansal? : भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजप प्रचंड बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हा विजय लिहिण्यासाठी पक्षाच्या अनेक नेत्यांनी मोठं काम केलं. यामधील एक नाव राष्ट्रीय महासचिव सुनील बन्सल यांचंही आहे. ५७ वर्षीय सुनील बन्सल पडद्याच्या मागे राहून काम करणारे खेळाडू आहेत. मीडियाच्या चर्चेपासून दूर असलेले बन्सल हे शांतपणे संघटनेचं काम करीत होते. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरुवात...

उत्तर प्रदेशात भाजपची चार वेळेस सातत्याने विजय, ओडिशा आणि तेलंगणात उत्कृष्ट कामगिरी आणि आता पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयामागे बन्सल यांची भूमिका चर्चेत आहे. आरएसएसच्या विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करणारे बन्सल राजस्थानमधील राहणारे आहेत. ते १९८९ मध्ये राजस्थान विद्यापीठाचे महासचिव म्हणून निवडून आले होते. यानंतर ते संघाशी जोडले गेले. १९९० च्या आरएसएस प्रचारक म्हणून काम सुरू केलं. यानंतर त्यांनी भाजपचे सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं. 

Advertisement

अमित शाहांच्या योजना प्रत्यक्षात उतरवल्या...

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी आरएसएसने त्यांना भाजपमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला. ते उत्तर प्रदेशचे सहसंघटन मंत्री बनले. यादरम्यान अमित शाह महासचिव म्हणून उत्तर प्रदेशाचे प्रभारी होते. तेव्हा बन्सल यांना शाह यांच्या जवळ राहून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आपली संघटन क्षमता आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे शाहांना प्रभावित केलं. विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून बूथ स्तरावर पक्ष मजबूत करण्याच्या शाह यांच्या योजनांच्या अंमलबजावणीत बन्सल यांनी भूमिका बजावली. त्यांनी शाह यांची 'पन्ना प्रमुख' ही रणनीती आणि 'मेरा बूथ सबसे मजबूत' हा कार्यक्रम राबवला.

नक्की वाचा - 3 जागांवरुन 192 पर्यंत उडी; पश्चिम बंगालमध्ये सत्ताविरोधी लाट का निर्माण झाली? दीदींच्या पराभवाची 7 मोठी कारणं


तीन राज्यांचे प्रभारी...

२०१४ मध्ये भाजपने शानदार कामगिरी केली आणि राज्यातील ८० पैकी ७३ लोकसभा जागा जिंकल्या. यानंतर बन्सल यांना प्रमोट करीत उत्तर प्रदेशाचे संघटन मंत्री बनविण्यात आलं. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशासाठी बन्सल यांचा मोठा हात होता. यानंतर २०१९ आणि २०२२ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात पक्षाला विजयी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते सलग आठ वर्षे उत्तर प्रदेशात संघटन मंत्री होते. यादरम्यान योगी सरकारने संघटनेच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली. २०२२ मध्ये योगी सरकारच्या वापसीनंतर त्यांना दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना जेपी नड्डा यांच्या टीममध्ये राष्ट्रीय महासचिव बनविण्यात आलं. त्यांना ओडिसा, तेलंगना आणि पश्चिम बंगाल सारख्या महत्त्वपूर्ण राज्यांचे प्रभारी करण्यात आलं. 


बंगालमधील लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही...

तेलंगणामध्येही बन्सल यांचं संघटनात्मक कौशल्य यशस्वी ठरलं. त्यांच्या रणनीतीमुळे भाजपला निवडणुकीत यश मिळालं आणि राज्यातील १७ पैकी आठ जागांवर भाजपने विजय मिळवला. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. त्यावेळी भाजपने ४०.६४ टक्के मते मिळवून १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०२४ मध्ये त्यांच्या कामगिरीत घसरण झाली आणि ३८.७३ टक्के मते मिळवून भाजपला केवळ १२ जागांवर विजय मिळवता आला होता.

Advertisement


बन्सल आहेत भाजपचे इलेक्शन इंजिनियर...

बन्सल यांनी राज्याचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सह-प्रभारी त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब व आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्यासह, पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांच्या विजयाच्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यासाठी काम केलं. यामुळे पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला. सुनील बन्सल यांची कार्यशैली शांत राहून संघटनेला मजबूत करण्याची आहे. त्यांना भाजपचा इलेक्शन इंजिनियर मानलं जातं. ते कठीण राज्यांमध्येही पक्षाच्या संघटनेची रचना उभी करणे आणि निवडणुकीत यश मिळवून देण्यात माहिर आहेत.