जाहिरात

सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने मौल्यवान; 1 ग्रॅमच्या किमतीत बांगड्या, झुमके, कानातले, नथ होईल तयार!

किंग कोब्राचं विष प्रोटीनयुक्त असतं. दीर्घकालीन वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये या विषाचा वापर केला जातो.

सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने मौल्यवान; 1 ग्रॅमच्या किमतीत बांगड्या, झुमके, कानातले, नथ होईल तयार!
Snake Venom Vs Gold : सापाचं विष किती महाग?

Gold Vs Venom : जगभरात सापांबाबत उत्सुकता, आकर्षण आणि भीतीची भावना कायमच पाहायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरातील ३००० हून अधिक सापांच्या प्रजातींपैकी अवघे १० टक्के म्हणजे ३०० हून कमी प्रजाती विषारी असतात. ताइपनसारखे काही साप इतके विषारी असतात की त्यांच्या एका दंशाने १०० लोकांचा जीव जाऊ शकतो. एका रिपोर्टनुसार, सर्पदंशाने दरवर्षी १,४०,००० लोकांचा मृत्यू होतो. या डेटावरून समजून घेऊया सापाच्या विषापासून औषध बनवणं किती महत्त्वाचं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

अलिकडेच, गुजरातमधील धरमपूर येथील सर्प संशोधन संस्था औषधे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे चर्चेत आली आहे. गुजरात सरकारच्या पाठिंब्याने चालणाऱ्या या संस्थेने अलीकडेच कोब्रा, कॉमन क्रेट आणि रसेल वाइपर सारख्या प्रजातींमधून चांगल्या दर्जाच्या विषाच्या ई-लिलावात खूपच जास्त किंमत मिळवली आहे. महत्त्वाचं म्हणजे यावरुन लक्षात येतं की सापाचं विष किती मौल्यवान असतं. सापांमध्ये हे विष कुठं तयार होतं आणि ते कसं काढलं जातं हे पाहूया.

Latest and Breaking News on NDTV

सापाचं विष कसं काढलं जातं?

साप चावल्याने मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होता आणि हेच पाहून अँटीडॉट म्हणजे विषविरोधी औषध तयार करण्याची गरज वाढली आहे. Let's Talk Science च्या अनुसार, सापाच्या डोक्याच्या मागच्या भागातील ग्रंथींमध्ये विष तयार होतं आणि साप चावल्यानंतर विष समोरच्याच्या शरीरात प्रवेश करतं. जेव्हा विषविरोधी औषध तयार केलं जातं, त्यावेळी सापाचं विष अत्यंत सावधानतेने काढलं जातं. विष काढण्याच्या प्रक्रियेत सापाला कोणत्याही भांड्याला चावायला दिलं जातं. मग त्या भांड्यात सोडलेलं विष जमा केलं जातं. दुसऱ्या पद्धतीत सापाच्या तोंडातील विष फेकणाऱ्या जागेतून विष एकत्र केलं जातं.

पाहा हा व्हिडिओ...

सोन्यापेक्षा सापाचं विष किती महाग असतं?

फ्लोरिडा विश्वविद्यापीठानुसार, विषाचं प्रमाण सापाच्या विविध प्रजातींमध्ये वेगवेगळं असतं. जे १ मिलीग्रॅमपासून ८५० मिलीग्रॅम किंवा त्याहून अधिक असतं. काही सापांचं विष वेदनाशामक म्हणून आणि रक्त गोठण्यासाठी वापरले जाते.

Latest and Breaking News on NDTV

किंग कोब्राचं विष प्रोटीनयुक्त असतं. दीर्घकालीन वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये या विषाचा वापर केला जातो. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे विष असल्याचं म्हटलं जातं, ज्याची किंमत प्रति गॅलन १.५ लाख डॉलर आहे. स्मिथसोनियन मासिकाच्या मते, अँटीवेनमच्या एका डोसची किंमत १४,००० डॉलरपर्यंत पर्यंत असू शकते.

आता कोरल आर ब्राउन सापांच्या विषाचा वापर अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीवेनमच्या औषधांच्या निर्मितीमध्ये केला जातो. त्याच्या १ ग्रॅमची किंमत ४ हजार डॉलरपर्यंत असू शकते. काही विषाची किंमत एका ग्रॅममागे १२-१३ हजार डॉलरपर्यंत असू शकते. आता या विषाच्या किमतीची तुलना सोन्याशी केली तर विष कित्येक पटीने महाग आहे.

१ ग्रॅम सोन्याची किंमत सध्या १६६-१६७ डॉलर आहे. म्हणजेच १३ हजार डॉलरमध्ये तब्बल ७८-७९ ग्रॅम सोनं खरेदी करता येईल. हे २४ कॅरेट सोन्याचा भाव आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com