अमित शाहांनी राजनाथ सिंह यांच्यानंतर शपथ का घेतली? काय आहेत लोकसभेचे नियम?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. लोकसभेत कोणत्या क्रमानं सदस्यांना शपथ दिली जाते ते माहिती आहे का?

जाहिरात
Read Time: 2 mins
Amit Shah Rajnath Singh
मुंबई:

18 व्या लोकसभेचं पहिलं सत्र सुरु झालं आहे. नव्या लोकसभेत सर्वात प्रथम राष्ट्रगीत झालं. त्यानंतर यापूर्वीच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शपथ लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी त्यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. लोकसभेत कोणत्या क्रमानं सदस्यांना शपथ दिली जाते ते पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मोदींनंतर राजनाथ सिंह का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनी शपथ घेतली. केंद्रीय मंत्रीमंडळात पंतप्रधानांनतर संरक्षणमंत्री हे पद येतं. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी मोदींनंतर शपथ घेतली. राजनाथ सिंह यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शपथ घेतली. 

केंद्रीय मंत्र्यांच्या शपथविधीनंतर इंग्रजी अक्षरानुसार सर्व राज्यांच्या खासदारांना शपथ देण्यात येईल. या कारणामुळे आसाममधील खासदारांनी सर्वात प्रथम शपथ घेतली. तर पश्चिम बंगालमधील खासदार सर्वात शेवटी शपथ घेणार आहेत. 

ट्रेंडींग बातमी - लोकसभेत जे घडले ते...भाजपा कोअर कमिटीत कशावर झाली चर्चा? Inside Story

कोणत्या आघाडीला किती जागा?

या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएनं 293 जागा जिंकल्या आहेत. त्यामधील एकट्या भाजपानं 240 जागा जिंकल्या आहेत. तर विरोधी इंडिया आघाडीनं 234 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला आहे. काँग्रेसकडं 99 जागा आहेत.

Advertisement

18 व्या लोकसभेच्या अध्यक्षांची निवड 26 जून रोजी होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची ओळख सभागृहाला करुन देतील. राष्ट्रपती 27 जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. 28 जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावर सादर केला जाईल आणि त्यावर चर्चा सुरु होईल. पंतप्रधान मोदी दोन आणि तीन जुलै रोजी या चर्चेला उत्तर देऊ शकतात. 
 

Topics mentioned in this article