जाहिरात

Revati Sule News: रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचे नागपूरमधील रिसेप्शन पुढे ढकलले; हे आहे मुख्य कारण

Supriya Sule Daughter Marriage: सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे नागपूरमधील रिसेप्शन पुढे ढकलले आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लखानी कुटुंबाने हा निर्णय घेतला.

Revati Sule News: रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचे नागपूरमधील रिसेप्शन पुढे ढकलले; हे आहे मुख्य कारण
"Supriya Sule Daughter Marriage: रेवती सुळे यांच्या लग्नाची तारीख आली समोर"
Supriya Sule Instagram

- प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

Supriya Sule Daughter Marriage: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सारंग लखानी यांच्यासोबत येत्या 20 जून रोजी मुंबईत पार पडणार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका आवाहनानंतर लखानी आणि सुळे कुटुंबाने नागपूरमध्ये होणारा लग्नाचा भव्य रिसेप्शन सोहळा (स्वागत समारंभ) पुढे ढकलण्याचा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद, नागपूरचे रिसेप्शन पुढे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सार्वजनिक समारंभांमधील अनावश्यक खर्च कमी करण्याचे आणि साधेपणा पाळण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाचा आदर करत सारंग यांचे वडील अरुण लखानी यांनी नागपूरमधील रिसेप्शन सोहळा तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या नागपूरच्या रिसेप्शनची नवी तारीख लखानी आणि सुळे कुटुंबाकडून लवकरच निश्चित केली जाणार आहे.

दरम्यान लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेऊन त्यांना विवाह सोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.

(नक्की वाचा : NDTV Marathi Manch: नारी शक्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, पुण्याला म्हणाल्या 'क्राईम कॅपिटल')

5 जुलै रोजी पुण्यात रिसेप्शन सोहळा

मुंबईतील मुख्य विवाह सोहळ्यानंतर, सुळे आणि लखानी परिवाराकडून पुण्यातही एका भव्य स्वागत समारंभाचे (रिसेप्शन) आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com