राष्ट्रपतींच्या भेटी दरम्यान PM मोदींनी हिरवं जॅकेट का घातलं होतं?

PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


18 व्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालंय. केंद्रात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार सत्तेत येणार आहे. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 8 तारखेला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी बुधवारी जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं (World Environment Day 2024)  बुद्ध जयंती पार्कमध्ये वृक्षारोपण अभियानाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी खास हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतिक आहे. तो पर्यावरणाशी देखील निगडित आहे. पंतप्रधान मोदींनी आजच्या दिवशी हिरव्या रंगाचं जॅकेट घालून पर्यावरणाबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.  

वृक्षारोपण कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी प्रथम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. या भेटीच्या दरम्यानही त्यांनी हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होतं.

( नक्की वाचा : PM Modi Speech : 'मी देशवासीयांचा ऋणी आहे', निकालानंतर मोदी काय म्हणाले? )

दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रकडून 1972 साली सर्वप्रथम हा दिवस साजरा करण्यात आला. पहिलं पर्यावरण संमेलन 5 जून 1972 रोजी झालं. त्यामध्ये 119 देश सहभागी झाले होते.स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये हे संमेलन झालं होतं. 

( नक्की वाचा : राहुल गांधींनी एक चूक केली नसती तर आज देशाचं चित्र वेगळं असतं )

Topics mentioned in this article