Instagram Ban in India Viral MSG Fact Check: इन्स्टाग्राम हा लोकप्रिय अन् सर्वांचेच आवडते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनला आहे. अगदी लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वच जण इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असतात, कंटेट तयार करत असतात. भारतात तर सर्वांनाच एन्स्टाग्राम स्क्रॉलिंगचे वेड लागलं आहे. अशातच एका व्हायरल मेसेजने इन्स्टा युजर्सची चिंता वाढली आहे. भारत सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्रामवर बंदी घालणार आहे, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आता सरकारनेच महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलं आहे.
भारतात इन्स्टाग्रामवर बंदी; व्हायरल मेसेजचे सत्य काय?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 25 ऑगस्ट 2026 च्या रात्रीपासून भारत सरकार इन्स्टाग्रामवर बंदी घालणार आहे असा मेसेज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नीट आंदोलनानंतर दिशाभूल करणारी माहिती, आक्षेपार्ह मेसेज इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा ही मेसेजमध्ये करण्यात आला होता. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहनसुद्धा या पोस्टमध्ये करण्यात आलं होतं. मात्र ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर अवलंबून असलेल्यांची चिंता वाढली होती, याबाबत आता केंद्र सरकारने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Pune News: कृपया लक्ष द्या! दिवे घाट राहणार बंद; कधी अन् किती वेळ? जाणून घ्या पर्यायी मार्ग
केंद्र सरकरचा खुलासा
ही व्हायरल होत असलेली बातमी खोटी असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक युनिटने सोशल मीडियावर पसरत असलेला एक दावा पूर्णपणे खोटा असल्याचे फेटाळून लावले आहे. भारतीय सरकारने इंस्टाग्रामवर कोणत्याही प्रकारच्या बंदीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. ही बातमी पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे, असा महत्त्वाचा खुलासा पीआयबीने केला आहे.
सोशल मीडिया पर एक पोस्ट साझा कर दावा किया जा रहा है कि भारत सरकार द्वारा 25 अगस्त 2026 की रात से भारत में #Instagram पर प्रतिबंध लगा दिया जाएगा।#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 27, 2026
❌ यह दावा #फर्जी है।
✅ भारत सरकार द्वारा ऐसी कोई घोषणा नहीं की गई है।
⚠️कृपया सतर्क रहें और ऐसे भ्रामक दावों के… pic.twitter.com/6v9Dz8bdUV
दरम्यान, व्हायरल मेसेजमधून करण्यात आलेला इन्स्टाग्राम बंदचा दावा सपशेल खोटा आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, कृपया सतर्क राहा आणि अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना बळी पडू नका.खात्रीशीर माहितीसाठी केवळ अधिकृत सरकारी स्रोतांवरच अवलंबून राहा, असे आवाहनही पीआयबीने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world