जाहिरात

Pune News: कृपया लक्ष द्या! दिवे घाट राहणार बंद; कधी अन् किती वेळ? जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे ते सासवड आणि सासवड ते पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या दोन तासांत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News: कृपया लक्ष द्या! दिवे घाट राहणार बंद; कधी अन् किती वेळ? जाणून घ्या पर्यायी मार्ग

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Dive Ghat Closed:  ​पुणे आणि सासवड दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवे घाटात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे आज मंगळवारी (२८ जुलै) दुपारी १२ ते २ या वेळेत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

Ganeshotsav 2026: वेध गणेशोत्सवाचे! मध्य रेल्वेकडून 246 विशेष गाड्यांची घोषणा; संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचं! आज दिवे घाट बंद

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  आज मंगळवारी (२८ जुलै) दुपारी बारा ते दोन या वेळेत दिवे घाटातील घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. घाटाचे रुंदीकरण करताना डोंगर कपारीमध्ये नियंत्रित स्फोटांचा (ब्लास्टिंग टेक्नॉलॉजी) वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते सासवड आणि सासवड ते पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या दोन तासांत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​या कालावधीत वाहनचालकांनी गैरसोर टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. कोंढव्यातील बोपदेव घाट मार्गे पुणे आणि सासवड दरम्यान ये-जा करावी, असे स्पष्ट निर्देश वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. घाटातील हे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि प्रवाशांची सुरक्षा कायम राहावी, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ticket Booking Rule: तात्काळ तिकीट बुकिंगची प्रोसेस बदलली! काय आहे नवा नियम? 1 ऑगस्टपासून लागू होणार

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com