Jaipur Viral News: जयपूरमध्ये एका 35 वर्षीय महिलेनं गृहकर्जाच्या म्हणजेच होम लोन इएमआयच्या तणावात आयुष्य संपवलं. मनीषा असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन घर खरेदी केल्यानंतर ती गृहकर्जाचा हफ्ता फेडण्याच्या चिंतेत होती.होम लोनचा पहिला इएमआय 15 ऑगस्टला जमा होणार होता.त्यानंतर तिने जीवन संपवलं.मृत महिलेचा पती जयपूरमध्येच मूर्ती बनवण्याचं काम करतो.
नवीन घरात शिफ्ट होण्याची केली होती तयारी
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा आणि तिचा पती ओमप्रकाश करतारपुराच्या महावीर कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. काही दिवसांपूर्वीच हाथोज परिसरात जवळपास 49 लाख रुपयांचं घर खरेदी केलं होतं.यासाठी 44 लाख रुपयांचं होम लोन घेतलं होतं. घराचं रजिस्ट्रेशन आठ दिवसांपूर्वीच मनीषाच्या नावावर करण्यात आलं होतं आणि एकादशीनंतर कुटुंबीयांनी नव्या घरात शिफ्ट होण्याची तयारी केली होती.
नक्की वाचा >> Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, "शिवसेना कोणाची, याचं उत्तर.."
तिने साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतला अन्..
बुधवारी संध्याकाळी मनीषाने पती आणि दोन्ही मुलांसोबत चहाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पती मोबाईल ठीक करण्यासाठी बाहेर गेला.त्यानंतर मनीषाने दोन्ही मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवलं आणि रुमचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिने साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतला. काही वेळानंतर पती घरी परतला आणि त्याने दरवाजा वाजवला.तसचे फोनही केले.
नक्की वाचा >> Pune News: पुणे स्थानकातून तब्बल 3 कोटींचे बेडशीट, टॉवेल चोरले, रेल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांची हातसफाई
परंतु,कोणताही प्रतिसाद आला नाही. दरवाजा तोडल्यानंतर तो आतमध्ये शिरला तेव्हा मनीषाचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. या घटनेची माहिती मिळताच महेश नगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला.गुरुवारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु आहे.