जाहिरात

Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, "शिवसेना कोणाची, याचं उत्तर.."

खरी शिवसेना आमचीच आहे, असा दावा दोन्ही शिवसेना गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, "शिवसेना कोणाची, याचं उत्तर.."
Eknath Shinde Latest News

राहुल तपासे, प्रतिनिधी 

Eknath Shinde Latest News :  खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट यांच्यातील पक्षाबाबतचं हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. खरी शिवसेना आमचीच आहे, असा दावा दोन्ही शिवसेना गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दरेगावात माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? 

'शिवसेना नेमकी कोणाची? यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवर आणि विरोधकांच्या टीकेवर शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे."शिवसेना कोणाची,याचं स्पष्ट उत्तर महाराष्ट्रातील जनतेनेच आपल्या कौलातून दिले आहे,"असं मोठं विधान शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. "पूर्वी आमच्याकडे 40 आमदार होते.आज जनतेने 60 आमदारांना निवडून दिले आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा, महानगरपालिका,जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जनतेच्या दरबारात शिवसेनेवरचा विश्वास सिद्ध झाला आहे."

नक्की वाचा >> Pune News: पुणे स्थानकातून तब्बल 3 कोटींचे बेडशीट, टॉवेल चोरले, रेल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांची हातसफाई

 "सरकार आणि मुख्यमंत्री 'घटनाबाह्य'असल्याचा आरोप करणे ही विरोधकांची आता जुनी 'रिपीट कॅसेट'झाली आहे.जेव्हा एखादा निर्णय यांच्या बाजूने लागतो,तेव्हा हे न्यायालयाचे कौतुक करतात आणि निर्णय विरोधात गेला की न्यायव्यवस्था व निवडणूक आयोगावर आरोप करतात.
लोकशाहीत बहुमताला सर्वोच्च महत्त्व असते. हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, परंतु आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे,असंही शिंदे म्हणाले.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com