Woman Falls On Escalator Viral Video : मेट्रोपासून मॉल, बस स्थानक आणि रेल्वे स्टेशनवर एस्केलेटर म्हणजेच सरकता जीना असणं, आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण प्रत्येकालाच या स्वयंचलीत जीन्यावरून व्यवस्थित जाता येईल, हे मात्र नक्की सांगता येऊ शकत नाही..कारण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते आणि त्यांना ट्रेन पकडण्याची खूपच घाई असते. अशावेळी हे लोक पायऱ्यांच्या जीन्यावरून न जाता, शॉर्टकट मारून सरकता जीन्याचा वापर करतात. पण याचदरम्यान जर एखादी चूक झाली, तर प्रवासी या सरकत्या जीन्यावर पडतात आणि जखमीही होतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्या रेल्वे स्टेशनवर नेमकं काय घडलं?
या व्हिडीओत पाहू शकता की, साडी नेसलेली एक महिला एक्सेलेटरवरून जाण्याचा प्रयत्न करत असते. पण या जीन्याला पाहून ती घाबरते. तेव्हा एक व्यक्ती त्या महिलेला मदत करण्यासाठी पोहोचतो. पण जस जसं त्या महिलेचा तोल जातो, त्यामुळे ते दोघेही पडतात आणि नंतर धक्कादायक घटना घडते. या संपूर्ण घटनेला ज्या प्रकारे कॅमेरात कैद केलं आहे, ते पाहून लोकांनी संशय व्यक्त केला आहे की, खरंच हा एक अपघात होता की, हे फक्त रिल बनवण्यासाठी करण्यात आलंय.
नक्की वाचा >> कोहली बनणार जगातील नंबर 1 फलंदाज? सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडण्याची 'ही' एकमेव संधी, जाणून घ्या संपूर्ण गणित
हा व्हिडीओ फक्त 18 सेकंदाचा आहे. ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की,साडी नेसलेली एक महिला एस्केलेटर वर चढू लागली. जीन्यावर चढताना महिला घाबरलेल्या अवस्थेत असते. पण एका व्यक्तीच्या मदतीने ती महिला पुन्हा जीन्यावर चढण्याचा प्रयत्न करते आणि तिचा तोल बिघडतो. त्यावेळी महिला त्या व्यक्तीच्या आधारे कसंतरी स्वत:ला सावरते, असं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
इथे पाहा तो व्हायरल व्हिडीओ

ये Scene देखकर तो Escalator भी बोल रहा होगा,

मैं क्या करूं, जॉब छोड़ दूं? 🤣 pic.twitter.com/B32uRfY0Xh
— Md Zeyaullah🇮🇳 (@MdZeyaullah20) August 30, 2025

हा व्हिडीओ @MdZeyaullah20 नावाच्या यूजरने एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, हा सीन पाहून तर एस्केलेटरही बोलत असेल की,मी काय करू..जॉब सोडू?, हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने व्हिडीओला कमेंट करत म्हटलंय की, जेव्हा गावातील लोक शहरात जातात..दुसऱ्या यूजरने कमेंट करत म्हटलंय, बापरे..थोडक्यात जीव वाचला. अन्य एका यूजरने म्हटलंय, हा काय वेडेपणा आहे. तर अन्य काही नेटकऱ्यांनी रिल बनणाऱ्यांवर टीकाही केली आहे.
नक्की वाचा >> Video : जे अक्षय कुमारला जमलं नाही..ते शाहरुखने केलं, 'लापता लेडीज' फेम नितांशी गोयल स्टेजवर पडता पडता वाचली