जाहिरात

कोहली बनणार जगातील नंबर 1 फलंदाज? सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडण्याची 'ही'एकमेव संधी, जाणून घ्या संपूर्ण गणित

Virat Kohli vs Sachin Tendukar :  टीम इंडियाता माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या वनडे सीरिजमध्ये खेळणार आहे.विराटच्या भविष्यातील क्रिकेट करिअरच्या अनुषंगाने ही वनडे सीरिज विराटसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

कोहली बनणार जगातील नंबर 1 फलंदाज? सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडण्याची 'ही'एकमेव संधी, जाणून घ्या संपूर्ण गणित
Virat Kohli vs Sachin Tendulkar
मुंबई:

Virat Kohli vs Sachin Tendukar :  टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या वनडे सीरिजमध्ये खेळणार आहे. विराटच्या भविष्यातील क्रिकेट करिअरच्या अनुषंगाने ही वनडे सीरिज त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कोहलीच्या क्रिकेट करिअरबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ही सीरिज कोहलीसाठीच नाही, तर रोहित शर्मा साठीही शेवटची आंतराष्ट्रीय सीरिज ठरू शकते. जर असं घडलं, तर कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडू शकत नाही. पण विराट कोहली जर 2027 च्या वर्ल्डकपपर्यंत खेळला, तर त्याच्याकडे सचिनचा हा महारेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. 

13 वर्षांपूर्वी सचिनने केली होती भविष्यवाणी

सचिन तेंडुलकरने 13 वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती की, त्यांचा हा रेकॉर्ड विराट कोहली किंवा रोहित शर्माच मोडू शकतो.पुढच्या महिन्यात विराट कोहली 37 वर्षांचा होणार आहे. 2027 च्या वर्ल्डकपपर्यंत विराट कोहलीचं वय 39 वर्ष होईल. पण कोहली क्रिकेट विश्वातील सर्वात फिट खेळाडू म्हणून ओळखला जातो. अशातच कोहली 2027 पर्यंत वनडे क्रिकेट खेळला, तर त्याच्याकडे सचिनचा वर्ल्डरेकॉर्ड मोडण्याची संधी असेल.

कोहलीच्या नावावर 82 शतक, 100 साठी फक्त 10 शतकांची गरज

कोहलीच्या नावावर आतापर्यंत एकूण 82 शतकांची नोंद आहे. कोहलीला 100 शतकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी 18 शतकांची आवश्यकता आहे.वनडेत कोहलीने 51 अर्धशतक ठोकले आहेत. विराटने कसोटी आणि टी-20 च्या आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण विराटला जर सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडायचा असेल, तर विराटला फक्त वनडे क्रिकेट खेळून या रेकॉर्डपर्यंत पोहोचावं लागेल.

नक्की वाचा >> IND vs WI: यशस्वी जैस्वाल OUT की NOT OUT? अंपायरने केलं मोठं ब्लंडर..नेमकी चूक कोणाची? Video ने उडवली खळबळ

विराट कोहली 100 शतक कसं पूर्ण करणार?

2027 वनडे वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघाला एकूण 24 वनडे सामने खेळायचे आहेत. यानंतर जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला,तर त्यांना 11 सामने खेळावे लागतील. अशातच विराट कोहलीला वर्ल्डकप 2027 पर्यंत एकूण 35 सामने खेळायचे आहेत. या 35 सामन्यांमध्ये विराटला 18 शतक ठोकावे लागतील, ज्यामुळे विराट सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड मोडू शकतो.

असा मोडू शकतो 100 शतकांचा महारेकॉर्ड

आता विराट कोहलीली फॉर्ममध्ये राहून एकूण 35 सामन्यांमध्ये 18 शतक ठोकावे लागतील. म्हणजेच प्रत्येक दुसऱ्या सामन्यात विराटला वनडे शतक मारण्याचा प्रयत्न करावा लागेल.असं केल्यानंतरच विराट सचिनच्या 100 शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी करू शकतो. अशी कामगिरी करणं म्हणजे एखादा चमत्कारच असेल. पण क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे, त्यामुळे इथे सर्वकाही शक्य आहे. 

नक्की वाचा >> धोनी दिसताच लिटल शिष्य धावत आला, चिमुकल्या खेळाडूनं स्टेडियममध्ये जे केलं..माहीलाही अभिमान वाटला! Video बघाच

वर्ल्डकप 2027 पर्यंत भारताचा ODI शेड्युल

  • ऑक्टोबर 2025 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तीन वनडे - परदेश दौरा)
  • नोव्हेंबर 2025 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तीन वनेड- घरगुती सीरिज)
  • जानेवारी 2026 : भारत विरुद्ध न्युझीलंड (तीन वनडे- घरगुती सीरिज)
  • जून 2026 : भारत विरुद्ध अफगानिस्तान (तीन वनडे - घरगुती सीरिज)
  • जुलै 2026 : भारत विरुद्ध इंग्लंड (तीन वनडे-परदेश दौरा)
  • सप्टेंबर 2026 : भारत विरुद्ध वेस्टइंडिज (तीन वनडे-परदेश दौरा)
  • नोव्हेंबर 2026 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (तीन वनडे-परदेश दौरा)
  • डिसेंबर 2026 : भारत विरुद्ध श्रीलंका (तीन वनडे- घरगुती सीरिज)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com