जाहिरात

Video : जे अक्षय कुमारला जमलं नाही..ते शाहरुखने केलं, 'लापता लेडीज' फेम नितांशी गोयल स्टेजवर पडता पडता वाचली

Filmfare Award 2025 Viral Videos :  'लापता लेडीज' सिनेमानं फिल्म फेअर 2025 मध्ये एक दोन नव्हे, तर एकूण 13 पुरस्कार जिंकले आहेत. अभिनेत्री नितांशी गोयलने बेस्ट डेब्यू फिमेलच्या पुरस्कार जिंकून फिल्म इंडस्ट्रीत मानाचा तुरा रोवला आहे.

Video : जे अक्षय कुमारला जमलं नाही..ते शाहरुखने केलं, 'लापता लेडीज' फेम नितांशी गोयल स्टेजवर पडता पडता वाचली
Shahrukh khan And Nitanshi Goel Viral Video
मुंबई:

Filmfare Award 2025 Viral Videos :   'लापता लेडीज' सिनेमानं फिल्म फेअर 2025 मध्ये एक दोन नव्हे, तर एकूण 13 पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये बेस्ट फिल्मपासून ते बेस्ट डेब्यु फिमेल कॅटेगरीच्या पुरस्कारांचा समावेश आहे. अभिनेत्री नितांशी गोयलने बेस्ट डेब्यू फिमेलच्या पुरस्कार जिंकून फिल्म इंडस्ट्रीत मानाचा तुरा रोवला आहे. पण नितांशीचा स्टेजवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसह देशभरात या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. दिग्गज अभिनेता शाहरुख खान स्टेजवर असताना नेमकं काय घडलं? जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून..

फिल्म फेअरच्या स्टेजवर नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओत पाहू शकता की, शाहरुख खान पायऱ्या चढून स्टेजवर येतो. त्याचदरम्यान लापता लेडीज फेम नितांशी पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजच्या दिशेनं येते. त्यावेळी शाहरुख या अभिनेत्रीचं स्वागत करण्यासाठी पुढे जातो, तेव्हा नितांशीचा थोडासा तोल जातो. पण शाहरुख तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिला स्टेजवर खाली पडण्यापासून वाचवतो.

नक्की वाचा >> कोहली बनणार जगातील नंबर 1 फलंदाज? सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडण्याची 'ही' एकमेव संधी, जाणून घ्या संपूर्ण गणित

व्हिडीओत दिसतंय की, नितांशीने फिल्म फेअर एवॉर्ड फंक्शनमध्ये पिवळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केलेला असतो. तर शाहरुख खान ब्लॅक कलरच्या जबरदस्त सूटमध्ये स्टेजवर होस्टिंग करत असतो. पण ज्यावेळी नितांशी स्टेजवर येते, तेव्हा शाहरुख नितांशीने घातलेला मोठा गाऊन सांभाळत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर अक्षय कुमार नितांशीला अवॉर्ड देतो. तर करण जौहर नितांशीला गळाभेट देतो आणि ती ठीक आहे की नाही? असंही तिला विचारतो. 

इथे पाहा शाहरूख खान आणि नितांशी गोयलचा व्हायरल व्हिडीओ

नक्की वाचा >> Reel बनवण्यासाठी रेल्वे पुलावर चढले,वंदे भारत ट्रेन पाठीमागून आली अन् कपलसोबत नको ते घडलं..थरारक Video व्हायरल

शाहरुख आणि नितांशीच्या व्हायरल व्हिडीओला यजूर्सने कमेंट्सचा प्रचंड वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सने शाहरुख खानचं कौतुक केलं आहे.एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, मी पण खाली पडतो आणि शाहरुखने मला सांभाळावं. दुसऱ्या यूजरने म्हटलंय, नितांशीचा जेनिफर लॉरेन्स मोमेंट..ज्या लोकांना माहित नाही, त्यांना सांगायचंय की, दोन ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर जेनिफर लॉरेन्सही स्टेजवर जाताना पडली होती. अभिनेता आमिर खानच्या मार्गदर्शनाखाली किरण रावने लापता लेडीज हा सिनेमा दिर्ग्दर्शीत केला होता. या सिनेमाला फिल्म फेअरचे 13 पुरस्कार मिळाले आहेत.तर याआधी रणवीर सिंहच्या गली बॉय सिनेमाला फिल्म फेअरचे पुरस्कार मिळाले होते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com