'हा नियम कोणी बनवला?', शॉर्ट्स घातलेल्या महिलेला मंदिरात प्रवेश नाकारला, नंतर झाला मोठा राडा, Video व्हायरल

Woman In Shorts Viral Video :  शॉर्ट्स घालून आलेल्या महिलेल्या मंदिरात प्रवेश नाकारल्याचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Women In Shorts Viral Video
मुंबई:

Woman In Shorts Viral Video :  शॉर्ट्स घालून आलेल्या महिलेल्या मंदिरात प्रवेश नाकारल्याचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तोकडे कपडे घातले म्हणून मंदिरात प्रवेश का दिला नाही? असा सवाल करत महिलेनं मंदिरात असलेला पुजारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. मंदिरात प्रवेश करण्यासाठी शॉर्ट्स कपड्यांचा असा काही नियम आहे का? असाही प्रश्न त्या महिलेनं मंदिर प्रशासनाकडे उपस्थित केला. मंदिरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खरंतर मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी कोणताही ड्रेस कोड नसतो. तरीही लोकांनी डिसेंट कपडे घालून मंदिरात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. 

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एका महिलेला तोकडे कपडे घातले म्हणून मंदिरात प्रवेश नाकारला. त्यानंतर महिलेनं मंदिरातील पुजारी आणि तेथील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद केला. या घटनेमुळं सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मंदिरात घालण्याचा ड्रेस कोड आणि धार्मिक सन्मानाबाबत नेटकऱ्यांनी त्यांचं वैयक्तिक मत प्रदर्शन केलं आहे. 

नक्की वाचा >>  छोट्या बहिणीसोबत Mobile मुळे वाद झाला! मोठ्या भावानं गळफास घेतला..सर्व पालकांना अलर्ट करणारी धक्कादायक घटना

व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, तोकडे कपडे घातलेल्या महिलेनं पोलीस कर्मचारी आणि मंदिरात असलेल्या पुजाऱ्याला याप्रकणावरून झापलं. महिला अधिकाऱ्यांवर जोरजोरात ओरडत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. शॉर्ट्स घालून मंदिरात येऊ नये, हा नियम देवाने बनवला नाही. हा नियम तुम्ही बनवला आहे, असं म्हणत त्या महिलेनं मंदिर प्रशासनाला सुनावलं. 

महिलेनं मंदिरात राडा केल्यानंतर दुसऱ्या एका महिलेनं या घटनेचा व्हिडीओ कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. मंदिरातील व्हिडीओ रेकॉर्ड करताना महिला म्हणते, महिलेनं मंदिरात शॉर्ट्स घातले आहेत. आता ती पुजारी आणि पोलिसांशी भांडण करत आहे. शॉर्ट्स घालून मंदिरात प्रवेश करणं योग्य आहे, असं त्या महिलेचं म्हणणं आहे.

Advertisement

नक्की वाचा >> 'तू आधी हिंदीत बोल',Dont Touch..', भाषेवरून 2 महिलांनी ऑफिसमध्ये केला तुफान राडा! व्हायरल Video ने उडवली खळबळ

पण पोलीस त्या महिलेला प्रवेश देत नाहीत, हे योग्यच आहे, असं मत दुसऱ्या एका महिलेनं व्यक्त केलं. हा व्हायरल व्हिडीओ @VigilntHindutva नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 6 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. एका यूजरने या व्हिडीओला कमेंट करत म्हटलंय, सर्व मंदिरात पुरुष आणि महिला दोघांसाठी डिसेंट ड्रेस कोड असतो. हे आम्हाला लहानपणापासूनच शिकवलं आहे.