जाहिरात

छोट्या बहिणीसोबत Mobile मुळे वाद झाला! मोठ्या भावानं गळफास घेतला..सर्व पालकांना अलर्ट करणारी धक्कादायक घटना

Child Ends Life Because Of Mobile Phone : घरी पालक नसल्यावर लहान मुलांना सांभाळणं म्हणजे इतरांसाठी तारेवरची कसरतच असते. कारण दोन भावंडांमध्ये वादविवाद झाल्यावर कधी भयंकर घटना घडेल, याचा काही नेम नाही.

छोट्या बहिणीसोबत Mobile मुळे वाद झाला! मोठ्या भावानं गळफास घेतला..सर्व पालकांना अलर्ट करणारी धक्कादायक घटना
Child Mobile Addiction Viral News

Child Ends Life Because Of Mobile Phone : घरी पालक नसल्यावर लहान मुलांना सांभाळणं म्हणजे इतरांसाठी तारेवरची कसरतच असते. कारण दोन भावंडांमध्ये वादविवाद झाल्यावर कधी भयंकर घटना घडेल, याचा काही नेम नाही. दिवसेंदिवस लहान मुलांना मोबाईलचं वेड लागत असल्याने धक्कादायक घटना घडत असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येतं.अशीच एक खळबळजनक घटना नॉर्थ वेस्ट दिल्लीच्या आदर्श नगर येथील लालबाग परिसरात घडली आहे. एका कुटुंबातील दोन लहान भावंडांमध्ये मोबाईलवरून वाद झाला. मोबाईलवर गेम खेळण्यावरून दोघांमध्ये वाद उफाळला आणि अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवलं.त्यानंतर कुटुंबियांनी गळफास घेतलेल्या मुलाला रुग्णालयात नेलं. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

कुटुंबाला बसला सर्वात मोठा धक्का

कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा मोबाईल गेम खेळण्याच्या जिद्दीमुळे मृत्यू झाला. या घटनेमुळं मृत मुलाच्या पालकांसह कुटुंबियांना धक्का बसला. मुलांना सर्व सुख सुविधा देण्यासाठी पालक जीवाचं रान करतात. मुलांचे खूप लाड करतात. पण एखाद्या क्षुल्लक कारणावरून मुलांमध्ये भांडण होतं आणि ते विकोपालं जातं. मोठ्या भावाने आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलल्याने छोट्या बहिणीच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. भावाने इतक्या छोट्या गोष्टीमुळे स्वत:ला संपवलं, यावर तिचा विश्वासच बसला नाहीय. दरम्यान, या घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा >>  प्रवाशांसाठी खुशखबर! 'ही' एकच APP डाऊनलोड करा, एसटीचं परफेक्ट लोकेशन कळणार

लहान मुलांना शिक्षणाचे धडे गिरवत असताना काही वाईट सवयींच वेडंही लागतं. काही मुलं त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांचं जीवन जगत असतात. पण त्यांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे पालकांचं टेन्शन वाढतं.तसच मुलांनी महागडे गिफ्ट किंवा खेळणी मागण्याचा हट्टपणा केल्यास, पालकांनाही त्यांचा राग येतो. काही पालक त्यांच्या मुलांचे खूप लाड करतात. पण काही जण मुलांच्या करिअरबाबत गंभीर असतात. मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर काही पालक त्यांच्यावर ओरडतात. अशा परिस्थितीत मुलांनी जीवन संपवण्याचा टोकाचं निर्णय घेतल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. 

नक्की वाचा >> 'तू आधी हिंदीत बोल',Dont Touch..', भाषेवरून 2 महिलांनी ऑफिसमध्ये केला तुफान राडा! व्हायरल Video ने उडवली खळबळ

Listen to the latest songs, only on JioSaavn.com