जाहिरात

'तू आधी हिंदीत बोल',Dont Touch..', भाषेवरून 2 महिलांनी ऑफिसमध्ये केला तुफान राडा! व्हायरल Video ने उडवली खळबळ

Women Fight Viral Video :  देशातील प्रत्येक राज्यांमध्ये त्यांच्या प्रांतानुसार विविध भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

'तू आधी हिंदीत बोल',Dont Touch..', भाषेवरून 2 महिलांनी ऑफिसमध्ये केला तुफान राडा! व्हायरल Video ने उडवली खळबळ
Women Fight Viral Video
मुंबई:

Women Fight Viral Video :  देशातील प्रत्येक राज्यांमध्ये त्यांच्या प्रांतानुसार विविध भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेषत: ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भाषेवरून मोठा राडा झाल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. आताही दोन महिलांमध्ये भाषेवरून वाद झाल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत 2 महिला भाषेच्या मुद्द्यावरून सार्वजनिक ठिकाणी मोठा वाद घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका महिलेला हिंदी भाषेत बोलायचं असतं, तर दुसऱ्या महिलेला कन्नड भाषेचा अभिमान असतो. दोघीही त्यांच्या मतावर ठाम राहतात आणि काही क्षणातच दोघींमध्ये वादाची ठिणगी पेटते.

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

या व्हायरल व्हिडीओ पाहू शकता की,दोन महिला त्यांच्या पसंतीची भाषा बोलतात. एकीला हिंदी बोलायचं असतं, तर दुसऱ्या महिलेला कन्नड भाषा बोलायला आवडतं. दोघींनाही त्यांच्या भाषेबद्दल सार्थ अभिमान असल्याने त्यांच्या मतभेद निर्माण होतात आणि बघता बघता वाद सुरु होतो. एक महिला दुसऱ्या महिलेला हात लावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती महिला तिच्यावर ओरडते आणि डोन्ट टच मी असं म्हणते. त्यानंतर बाजूला असलेल्या एक व्यक्ती त्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. 

नक्की वाचा >> Ulhasnagar Crime 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ

साडी नेसलेल्या महिलेला हिंदीतच बोलायचं असतं. त्यामुळे ती हिंदी बोलण्यावर ठाम राहते.पण दुसऱ्या महिलेला हिंदी बोलणाऱ्या महिलेचे हावभाव आवडत नाहीत. त्यामुळे कन्नड भाषा बोलणारी महिला हिंदी भाषा बोलणाऱ्या महिलेवर चिडते. हा व्हिडीओ एखाद्या बँकमधील असल्याची शक्यता सोशल मीडियावर वर्तवण्यात आली आहे. 26 सेकंदांच्या या व्हिडीओला यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

महिलांच्या भांडणाचा हा व्हिडीओ @gharkekalesh या ट्वीटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत यूजरने म्हटलंय, कर्नाटकमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून दोन महिलांमध्ये वाद होतो. आतापर्यंत या व्हिडीओला 5 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर शेकडोंच्या संख्येत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, कोणी अशिक्षित असेल, जो भाषेवरून वाद करतो. दुसऱ्या यूजरने म्हटलंय, जेव्हा अहंकार वाढतो, तेव्हा भाषाही युद्धाचं मैदान होतं. 

नक्की वाचा >> 'मला रडू कोसळलं..घरात सुखाचा घास सुद्धा तोंडात गेला नाही', पंकजा मुंडेंनी भगवानगडावर सांगितला 'तो' किस्सा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com