पोस्टात खातं उघडलं की 8 हजार रुपये मिळणार? पहाटे 3 पासूनच लागल्या रांगा, वाचा काय आहे सत्य

महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं की त्यांना 8 हजार रुपये मिळणार अशी अफवा शहरामध्ये पसरली. मग काय पहाटे 3 वाजल्यापासून महिलांनी पोस्ट ऑफिसच्या बाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली.

Advertisement
Read Time: 2 mins
बंगळुरु:

महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं की त्यांना 8 हजार रुपये मिळणार अशी अफवा शहरामध्ये पसरली. मग काय पहाटे 3 वाजल्यापासून महिलांनी पोस्ट ऑफिसच्या बाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली. व्हॉट्सअप आणि लोकल ग्रुपमध्ये आलेल्या मेसेजनुसार हे खातं उघडण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता. त्यामुळे अनेक वृद्ध महिला, लहान मुली, अगदी स्तनदा माता देखील त्यांचं खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या बाहेर उभ्या राहिल्या. मोठी गर्दी पाहून पोस्ट खात्याला काम करण्यासाठी अधिक कर्मचारी नियुक्त करावे लागले. त्याचबरोबर गर्दीला शांत करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

देशातली आयटी सिटी अशी ओळख असलेल्या बंगळुरुमध्ये सोमवारी सकाळी हे चित्र होतं. पोस्ट खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) मध्ये खातं उघडल्यानंतर 8 हजार रुपये मिळणार या माहितीवर विश्वास ठेवून शहरातल्या कानाकोपऱ्यातील महिला पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्यासाठी आल्या होत्या. 

टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी महिलांना रोख रक्कम देण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये खातं सुरु केलं तर आपल्याला या योजनेचा फायदा मिळेल, असा त्यांचा समज झाला. 

( नक्की वाचा : 17 नंबरच्या फॉर्मवरुन धुमाकूळ, निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्रस्त, पुण्यात नेमकं घडलं तरी काय?)
 

काय आहे सत्य?

बंगळुरु जीपीओचे प्रमुख पोस्टमास्टर एचएम मंजेश यांनी सांगितलं की, 'आम्ही आवाहन केल्यानंतरही अनेक जण जीपीओमध्ये येत होते. त्यामधील बहुतेक जण लांबच्या भागातून इथं पोहोचले होते. पोस्ट ऑफिसची या पद्धतीची कोणताीही योजना नाही, असे पोस्टरही आम्ही गेटवर लावले होते. त्यानंतरही अनेक महिला इथं आल्या होत्या. त्यामधील काही जणांना वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास झाला. पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वैद्यकीय मदत केली. 

Advertisement

सोमवारी दुपारर्यंत जवळपास 2 हजार महिलांनी जीपीओमध्ये खातं उघडलं होतं. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आम्ही रोज 100 ते 200 नवी खाती सुरु करतो. पण, मागच्या एक आठवड्यात आम्ही एक दिवसात 700 ते 800 खाती सुरु केली आहेत.  

( नक्की वाचा : राहुल गांधी, केजरीवालांना पाकिस्तानातून पाठिंबा का मिळतो? PM मोदींनी दिलं उत्तर )
 

मंजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडू शकता. त्यासाठी कुणालाही जीपीओमध्ये येण्याची गरज नाही. त्याचबरोर खातं उघडण्याची ऑनलाईन देखील सुविधा आहे. पोस्ट ऑफिसमधील कुणी त्यांच्या घरी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी येऊ शकतो.'
 

Advertisement
Topics mentioned in this article