जाहिरात

राहुल गांधी, केजरीवालांना पाकिस्तानातून पाठिंबा का मिळतो? PM मोदींनी दिलं उत्तर

PM Modi Interview : राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना सध्या पाकिस्तानमधून इतका पाठिंबा का मिळतोय ? या प्रश्नाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलंय.

राहुल गांधी, केजरीवालांना पाकिस्तानातून पाठिंबा का मिळतो? PM मोदींनी दिलं उत्तर
नवी दिल्ली:

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा अद्याप बाकी आहे. 1 जून रोजी सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IANS या वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना सध्या पाकिस्तानमधून इतका पाठिंबा का मिळतोय ? कलम 370 रद्द केल्यापासून आजपर्यंत प्रत्येक वेळी पाकिस्तानमधून त्यांची बाजू का घेतली जातीय? असा प्रश्न पंतप्रधानांना या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर मोदींनी उत्तर दिलं.

'ही निवडणूक भारतामध्ये होतीय. भारतीय लोकशाही खूप प्रगल्भ आहे. भारतीय मतदार या प्रकारच्या प्रयत्नांनी प्रभावित होणारे मतदार नाहीत. आपल्याशी शत्रूत्व असलेल्या लोकांना काही जणं का आवडतात हे मला माहिती नाही. काही लोकांच्याच बाजूनं त्यांच्याकडून हाक दिली जाते. हा खूप गंभीर आणि व्यापक चौकशीचा विषय आहे. मी सध्या ज्या पदावर आहे त्यावरुन याबाबत काही बोलावं असं मला वाटत नाही. पण, तुमची काळजी मी समजू शकतो, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

( नक्की वाचा : Exclusive : 73 व्या वर्षी 22 वर्षांच्या तरुणासारखा उत्साह कसा? PM मोदींनी सांगितलं रहस्य )

भ्रष्टाचारापासून जनता त्रस्त

भारतीय नागरिक भ्रष्टाचारापासून त्रस्त झाले आहेत. भ्रष्टाचार वाळवीसारखा देशातील सर्व व्यवस्था पोखरत आहेत. मी 2013-14 साली निवडणुकीत भाषणात भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत होतो त्यावेळी लोकं त्यांचा राग व्यक्त करत असत, असं मोदींनी सांगितलं.

2019 पूर्वी तुम्ही मोठ्या-मोठ्या गोष्टी बोलता पण, कोणतं पाऊल का उचलत नाही? कुणाला अटक का करत नाही? असा प्रश्न आम्हाला विचारला जात असे. ते आमचं काम नाही. स्वतंत्र एजन्सी ते काम करत आहे, असं उत्तर आम्ही देत होतो. आता अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे. आता माश्यांना पकडलं जातंय. आता आम्हाला त्यावर प्रश्न विचारला जातोय. मला समजत नाही ही कोणती गँग आहे? खान मार्केट गँग जी काही जणांना वाचवण्यासाठी या प्रकारचं नॅरेटीव्ह सेट करत आहे, असा सवाल पंतप्रधानांनी पकडला.

( नक्की वाचा : निवृत्तीच्या 6 दिवसांपूर्वी लष्करप्रमुखांना मुदतवाढ, वाचा काय आहे प्रकरण? )

तुम्ही पहिल्यांदा छोटे मासे पकडता. मोठे मासे निसटतात असं म्हणत होता. आता यंत्रणा प्रामाणिकपणे काम करत आहे. मोठी लोकंही पकडली जातायत त्यावर तुम्ही आरडाओरडा करत आहे. अटक करण्याचं काम स्वतंत्र एजन्सींचं आहे. त्याला तुरुंगात डांबायचं की बाहेर ठेवायचं? त्याच्यावरील खटला योग्य आहे की अयोग्य हे कोर्ट निश्चित करतं. मोदींची त्यामध्ये काहीही भूमिका नाही, असं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. 

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com