Youtuber रणवीर अलाहाबादिया थोडक्यात बचावला; समुद्रात बुडताना IPS-IRS अधिकारी दाम्पत्याने वाचवला जीव

Youtuber Ranveer Allahabadia : रणवीरने सांगितले की, "काल एका प्रसंगातून मी आणि माझी मैत्रिण थोडक्यात बचावलो आहोत.  समुद्रात पोहायला आम्हाल आवडते. मी लहानपणापासून हे करत आहे."

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रसिद्ध यूट्युबर रणवीर अलाहाबादिया आणि त्याच्या प्रेयसीचा एका IPS अधिकारी आणि IRS पत्नीने जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. रणवीर आणि त्याची प्रेयसी गोव्यात समुद्रात बुडत असताना एक आयपीएस अधिकारी पत्नीसह त्यांच्या मदतीला धावून आला. 24 डिसेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडली. 

रणवीर अलाहाबादियाने बुधवारी, ख्रिसमसच्या दिवशी एका इंस्टाग्राम पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. रणवीरने सांगितले की, "काल एका प्रसंगातून मी आणि माझी मैत्रिण थोडक्यात बचावलो आहोत.  समुद्रात पोहायला आम्हाला आवडते. मी लहानपणापासून हे करत आहे."

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"मैत्रिणीसोबत मी समुद्रात पोहत होतो. तेव्हा पाण्याच्या प्रवाहात अचानक आम्ही दोघेही वाहून जाऊ लागलो. जवळपास 5 ते 10 मिनिटे पाण्यात आम्ही धडपडत होतो. मदतीसाठी हाक मारण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते देखील शक्य झालं नाही", असं रणवीरने म्हटलं. 

(नक्की वाचा-  Shivsena MLA : शूटर्सना सुपारी दिली, तारीखही ठरली होती... शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट उघड?)

"काही वेळातच आमच्या नाका-तोंडात पाणी गेले. शुद्ध हरपल्यासारखं आम्हाला वाटत होतं. अखेर मी मोठ्याने मदतीसाठी आवाज दिला.  सुदैवाने जवळच आणखी एक कुटुंब पोहत होते, ते लगेच मदतीसाठी पुढे आले."

(नक्की वाचा- VIDEO : आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी घेतली स्वेच्छानिवृत्ती, मात्र निरोप समारंभातच पत्नीचा मृत्यू)

"आम्ही दोघेही चांगले पोहतो. मात्र निसर्गाचा कोप असा आहे की तो कधीतरी तुमच्या मर्यादांची परीक्षा घेतो. आम्हा दोघांना वाचवणाऱ्या IPS अधिकारी पती आणि IRS अधिकारी पत्नीच्या कुटुंबाचे मनःपूर्वक आभार मानतो. आम्ही आता पूर्णपणे ठीक आहोत", असं रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. मात्र ते IPS-IRS दाम्पत्य कोण आहे, हे मात्र रणवीरने सांगितलं नाही.