Kota Heart Attack Video: राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी पतीने सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र निरोप समारंभातच पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देवेंद्र चंदन असं निवृत्त पतीचं नाव आहे. तर दीपिका असं मृत पत्नीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र यांच्या पत्नीची प्रकृती काही दिवसांपासून सातत्याने खालावत होती. पत्नी दीपिकाची काळजी घेण्यासाठी देवेंद्र यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नोकरीच्या शेवटच्या दिवशी निरोप समारंभातच देवेंद्र यांच्या पत्नीचं निधन झालं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Room No. 602 : काय आहे मंत्रालयातील रहस्यमय रुमची गोष्ट? ते दालन घेण्यास मंत्री का घाबरतात?)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उपस्थित लोक दीपिका आणि देवेंद्र हार घालत त्यांचा सत्कार करत आहेत. सर्वजण आनंदात सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. इतर लोक टेबलभोवती उभे आहेत, टाळ्या वाजवत आहेत. मात्र दीपिका अचानक घाबरलेल्या दिसल्या.
अस्वस्थ वाटू लागल्याने ते टेबलला पकडण्याच प्रयत्न करतात. मात्र बरं वाटत नसल्याने त्या खुर्चीवर बसतात. त्यानंतर काही क्षणात समोर टेबलवर कोसळतात. त्यानतंर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले.
( नक्की वाचा : राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती )
दीपिका यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दाम्पत्याच्या ओळखीच्या लोकांच्या मते, दीपिका गेल्या काही वर्षांपासून हृदयाशी संबंधित काही समस्यांना तोंड देत होत्या. त्यातच त्यांच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world