जाहिरात

Zero Temple: असं प्राचीन मंदिर, जिथं पहिल्यांदा दगडावर लिहीला गेला 'शून्य', ते मंदिर तुम्हाला माहित आहे का?

दगडावर कोरलेल्या शून्याचा सर्वात जुना ऐतिहासिक पुरावा मानले जाते. इतिहासातील हा एक बहुमोल ठेवा म्हणून त्याकडे पाहीले जाते.

Zero Temple: असं प्राचीन मंदिर, जिथं पहिल्यांदा दगडावर लिहीला गेला 'शून्य', ते मंदिर तुम्हाला माहित आहे का?

दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या अंकांमध्ये '0' शून्य या अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. बँकिंग क्षेत्रापासून ते संगणक, अंतराळ विज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पर्यंतच्या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया शून्यावरच आधारलेला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की दगडावर कोरलेल्या '0' चे जगातील सर्वात जुने पुरावे एका मंदिरात आढळतात. हे मंदिर भारतात आहे. ते मंदिर 99 टक्के लोकांना माहितच नाही. त्याबाबतचाच इतिहास आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर कुठे आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे ही जाणून घेवूयात. 

हे मंदिर मध्य प्रदेशात आहे.  मध्य प्रदेशातील ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्याच्या परिसरात हे मंदिर आहे. 'चतुर्भुज मंदिर' हे प्राचीन हिंदू मंदिर  आहे. इतिहासकारांच्या मते, या मंदिराची निर्मिती 875-876 ईस्वी दरम्यान गुर्जर-प्रतिहार काळात झाली होती. हे मंदिर भगवान विष्णूच्या चतुर्भुज रूपाला समर्पित आहे. परंतु, या मंदिराची खरी ओळख त्याच्या भिंतीवर असलेल्या शिलालेखांमुळे आहे. जिथे आधुनिक आकाराच्या '0' चा पहिला लिखित पुरावा मिळतो. मात्र ही बाब फार कमी लोकांना माहित आहे. 

नक्की वाचा - Mumbai Protest: 'खिशात 50 ग्रॅम पावडर टाकेन, कायमचं अडकवेन' ज्या तरुणाला धमकी तोच समोर आला, सांगितलं सत्य

या मंदिराच्या भिंतीवर संस्कृत भाषेतील एक शिलालेख कोरलेला आहे. यात जमीन दान आणि फुलांच्या माळांविषयीची माहिती दिली आहे. या शिलालेखात 270 आणि 50 या सारख्या संख्या लिहिलेल्या आहेत. ज्यामध्ये '0' चा वापर आजच्या गोलाकार शून्यासारखाच दिसतो. म्हणूनच याला दगडावर कोरलेल्या शून्याचा सर्वात जुना ऐतिहासिक पुरावा मानले जाते. इतिहासातील हा एक बहुमोल ठेवा म्हणून त्याकडे पाहीले जाते. 

नक्की वाचा - Viral Video: तर आताचा सोडा...आंदोलक विद्यार्थ्यांसाठी थेट पोलीस व्हॅनसमोर उभी राहणारी 'ही' तरुणी आहे तरी कोण?

शून्य हा केवळ एक अंक नाही.  दशांश स्थानमूल्य पद्धतीचा (Decimal Place Value System) मुख्य आधार आहे. शून्याशिवाय मोठ्या संख्या लिहिणे आणि गुंतागुंतीची गणिते सोडवणे जवळजवळ अशक्य होते. आज गणित, बीजगणित, संगणक प्रोग्रामिंग, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग आणि अंतराळ संशोधनात शून्याची भूमिका अत्यंत केंद्रीय आहे. अशा या शुन्याचा इतिहास आणि उगम हा भारताशी जोडला गेला आहे. त्याचाच हा पुरावा आपल्याला प्राचिन चतुर्भुज मंदिरात पाहीयला मिळतो. ही बाब फार कमी लोकांना माहित आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com