शांत बसणं किंवा गप्प राहणं हे बऱ्याचदा ऐकण्याची किंवा विचार करण्याची पद्धत मानली जाते. मात्र शांत राहिल्याने शारिरीक, मानसिक आणि सामाजिक फायदा होऊ शकतो. याशिवाय शांत राहिल्याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.
जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन कामातही शांत असता तेव्हा नैसर्गिकरित्या शांत स्वभाव राखल्याने तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते जिथे लोक अनेकदा शांतता राखण्यात अपयशी ठरतात. ज्यामुळे केवळ नकारात्मक परिणाम होत नाही तर परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट होते. चला शांततेचे फायदे समजावून घेऊया.
नक्की वाचा - Smriti Irani : स्मृती इराणींनी 6 महिन्यात 27 किलो वजन केलं कमी, कोणता डाएट फॉलो केला?
शांत राहण्याचे १० फायदे....
१ नैराश्य दूर होतं - मौन हे तणाव आणि रक्तदाब कमी करतं, मन शांत करतं.
२ मानसिक शांतता - शांत राहिल्याने तुम्हाला अंतर्गत शांतता मिळते, ज्यामुळे तुम्ही ध्यानाच्या अधिक जवळ जाता.
३ मेंदूची कार्यक्षमता वाढते - शांत राहिल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि नवीन पेशी तयार होऊ शकतात.
४ एकाग्रता वाढेल - शांत राहिल्याने महत्त्वाच्या कामांमधील एकाग्रता वाढवण्यास मदत करते
५ चांगले विचार - मन शांत राहिल्याने नवे आणि चांगले विचार येतात, ज्यामुळे सर्जनशीलता वाढते
६ नातं मजबूत - शांत राहिल्याने तुम्ही दुसऱ्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकता आणि समजून घेता. ज्यामुळे नातं मजबूत होतं.
७ आत्मचिंतन - शांत राहिल्याने स्वत:चे विचार, मूल्य आणि हेतू समजून घेण्याची संधी मिळते.
८ मानसिक शांतता - नियमितपणे २४ तासातील १ तासासाठी मौनात राहिलात तर मानसिक शांतता मिळेल.
९ भावनात्मकता - यामुळे तु्म्ही स्वत:सोबत एक चांगलं भावनिक कनेक्शन निर्माण करू शकता.
१० चांगली झोप - शांत राहिल्याने मेंदू शांत राहतो. परिणामी रात्री चांगली झोप येते.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.