जाहिरात

Smriti Irani : स्मृती इराणींनी 6 महिन्यात 27 किलो वजन केलं कमी, कोणता डाएट फॉलो केला?

फिट असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र फिटनेस किंवा वजन कमी करणं सोपं नसतं.

Smriti Irani : स्मृती इराणींनी 6 महिन्यात 27 किलो वजन केलं कमी, कोणता डाएट फॉलो केला?

smriti irani weight loss :  फिट असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र फिटनेस किंवा वजन कमी करणं सोपं नसतं. यासाठी नियमित मेहनत करावी लागते. नोकरी, संसार आणि स्वत:ची इतर व्यवधानं सांभाळून व्यायाम करावा लागतो, आहाराकडे लक्ष द्यावं लागतं. अशातच स्मृती इराणींचा फिटनेस प्रवास लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तुलसीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली स्मृती इराणी यांचं कौतुक केलं जात आहे. 

स्मृती इराणींनी सहा महिन्यात तब्बल २७ किलो वजन कमी केलं आहे. राजकारणात आल्यानंतर त्यांचं वजन खूप वाढलं होतं. आता त्या पुन्हा फिट झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी क्रॅश डाएट केलं नाही. तर साधा, संतुलित आहार घेतला. या सर्व प्रवासादरम्यान त्यांनी शिस्त पाळली. 

फॅट ते फिट होण्याची खरी सुरुवात...

केवळ विचार करून वजन कमी होणार नाही हे त्यांनी निश्चित केलं. हळूहळू त्यांनी दैनंदिन कामात बदल करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी प्रोसेस्ड आणि जंक फूड बंद केलं. त्यांचा फोकस खाण्याच्या गुणवत्तेवर होता. केवळ वजन कमी करणे हा एकमेव हेतू नसून वेट लॉस हेल्दी पद्धतीने व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. 

Rice : भात खाल्ल्याने काय होतं? वजन कमी करायला कोणता तांदूळ खावा? जेवणामुळे वजन लवकर घटतं?

नक्की वाचा - Rice : भात खाल्ल्याने काय होतं? वजन कमी करायला कोणता तांदूळ खावा? जेवणामुळे वजन लवकर घटतं?

सोपा पण परिणामकारक डाएट प्लान...

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री स्मृती इराणी यांनी जॅकी श्रॉफने सांगितलेल्या खास डाएट प्लान फॉलो केला. काही पदार्थ त्यांनी पूर्णपणे टाळले. त्यांचा डाएट अत्यंत सोपा आहे. ते साखर, मैदा, तळलेले पदार्थ खाण्यास मज्जाव केला. आहारात अधिकांश फायबर, प्रोटीन यांचा समावेश केला, याशिवाय घरातील ताजं अन्न खाल्लं. डाळ, भाजी, सॅलेड हे त्यांच्या आहारातील महत्त्वाचे पदार्थ.  एकाच वेळी खूप खाण्याऐवजी त्यांनी जेवणाचे छोटे छोटे भाग केले. ज्यामुळे त्यांचं चयापचय सुधारलं आणि वजन नियंत्रणात येऊ लागलं. 

चालणं आणि व्यायामाची साथ..

स्मृती इराणी खूप हेव्ही वर्कआऊटच्या ऐवजी बेसिक व्यायाम करीत होत्या. त्या दररोज वॉक करीत होय्ता आणि थोडे फार व्यायम करीत. एकदम व्यायाम करण्यापेक्षी हळूबळू शरीराला सक्रिय करायला हवं असं त्या मानतात. वजन कमी करत असताना त्यांनी शिस्त पाळली. झोपण्याचा, सकाळी उठण्याचा वेळ निश्चित केला. रात्री उशीरा खाणं बंद केलं. त्या भरपूर पाणी पित होत्या. या चांगल्या सवयींचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला.  


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com