5 Foods That Never Expires: सद्यस्थितीत प्रत्येक पदार्थांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. अशावेळी काही पदार्थांना एक्सपायरी नसते अशा विधानावर विश्वास ठेवणं अवघड वाटतं. मात्र आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत जे बराच काळ टिकू शकतात. तर काही पदार्थ जितके जुने तेवढे अधिक चांगले मानले जातात. आधीच्या काळात पदार्थांना पॅकेजिंग आणि लेबलिंग केलं जात नव्हतं. आज आपण पाच असे पदार्थ पाहणार आहोत, जे कधी खराब होन नाही आणि वेळेनुसार अधिक फायदा देतात.
हे पाच पदार्थ कधीच खराब होत नाहीत (5 Foods That Never Expires)
१. मीठ
मीठ खराब होत नाही - मीठ तुम्ही वर्षभर साठवून ठेऊ शकता. मीठ कधी खराब होत नाही. याला ओलावा येऊ देऊ नये. मीठ कोरड्या डब्यात बंद करुन ठेवलं तर याची गुणवत्ता कायम राहते. मिठाचा वापर केवळ चव वाढवायला नाही तर पदार्ख सुरक्षित ठेवण्यासाठीही केला जातो.
२. मध
मध किती दिवसात खराब होतं? - मध दिवसागणिक अधिक गुणकारी होत जातं. त्यासाठी मध योग्य पद्धतीने डब्यात बंद ठेवायला हवं. मधावर साखरेचा स्तर निर्माण झाला तरी मध खराब होत नाही. थोडंस गरम केल्यानं मध पूर्वपदावर येतं. शुद्ध मध तुम्ही वर्षांपर्यंत उपयोगात आणू शकता.
३ लोणचं
योग्य पद्धतीने लोणचं तयार केलं आणि साठवून ठेवलं तर ते वर्षांपर्यंत खराब होत नाही. यामधील तेल, मीठ आणि मसाल्यांमुळे लोणचं बराच काळ टिकतं. जर ओलाव्यामुळे लोणच्यात हलकां फंगस किंवा वास येत असेल तर ते उन्हात ठेवू शकता आणि वरुन मोहरीचं तेल गरम करून टाका. यामुळे लोणचं पुन्हा खाण्यासाठी तयार.
४ तूप
सर्वसाधारपणे प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात तूप असतं. जुन्या काळायत लोक घरातच तूप कढवत असे आणि वर्षभर वापरत. तूप स्वच्छ भांड्यात ठेवलं आणि ओलावा किंवा पाणी लागू दिलं नाही तर वर्षभर चांगलं राहतं. तुपाचा स्वाद वेगळा येऊ लागला तर तूप गरम करून गाळून घ्या. या प्रक्रियेनंतर तूप पुन्हा पहिल्यासारखं होतं.
५ व्हिनेगर
व्हिनेगर मग ते पांढरं असा किंवा सफरचंदापासून तयार केलेलं असो कधीच खराब होत नाही. व्हिनेगरचा वास आणि चव उग्र असते. त्यामुळे व्हिनेगर बराच काळ सुरक्षित राहू शकतं. व्हिनेगरचा उपयोग लोणचं तयार करण्यासाठी किंवा सॅलेडमध्ये टाकण्यासाठीही वापरलं जातं.