- लिंबू पाण्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळेल.
- व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत म्हणजे लिंबू
- लिंबातील व्हिटॅमिन सीमुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते
Lemon Benefits: लिंबू हे प्रत्येक घरामध्ये सहज मिळणारे फळ आहे. चवीला आंबट असणाऱ्या या फळाचे असंख्य आरोग्यवर्धक फायदे आहेत. कोशिंबीर असो किंवा लिंबू पाणी या फळाच्या सेवनामुळे मूड फ्रेश होतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचा उत्तम साठा आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत लिंबाच्या सेवनामुळे अगणित फायदे मिळतात. फायदे कितीही असले तरीही लिंबाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास शरीरास अपाय होणे निश्चित आहे. शारीरिक समस्या टाळण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात लिंबाचे सेवन करणं आवश्यक आहे.
लिंबातील पोषणतत्त्वांची माहिती
व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत म्हणजे लिंबू, व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. लिंबातील पोषणतत्त्वांमुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास, त्वचेवर ग्लो येण्यास आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. डाएटमध्ये लिंबाचा समावेश कशा पद्धतीने, किती प्रमाणात करावा आणि कोणत्या वेळेस करावा? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
लिंबाच्या सेवनाचे 10 फायदे | Lemon Benefits
लिंबाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरास कित्येक फायदे मिळतील.
- शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊन सर्दी-खोकल्याची समस्या कमी होईल.
- शरीरातील कॅलरीज कमी होतील, यामुळे वेटलॉस होईल.
- शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील..
- लिंबातील व्हिटॅमिन सीमुळे त्वचेवर तेज येईल.
- लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते
- शारीरिक थकवा दूर होऊन मूड फ्रेश होईल.
- केसांचा कोरडेपणा कमी होईल.
- हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.
- पचनप्रक्रिया सुधारेल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
- तोंडाला येणारा दुर्गंध दूर होईल.
जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन करण्याचे दुष्परिणाम | Side Effects Of Lemon| Limbu Khanyache Dushparinam
आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केले तर ते शरीरास हानिकारक ठरू शकतात.
- जास्त प्रमाणात लिंबू खाल्ल्यास पोटात जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.
- दातांवरील थर कमकुवत होईल आणि यामुळे सेन्सेटिव्हिटी वाढेल.
- अल्सर किंवा गॅसची समस्या असणाऱ्यांनी मर्यादित प्रमाणात लिंबाचे सेवन करावे.
- लिंबाच्या आंबटपणामुळे घशामध्ये खवखव आणि जळजळ वाढेल.
- लिंबाचा रस त्वचेवर लावू नये, यामुळे त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात.
- जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील अॅसिडिटीची पातळी वाढेल.
- लिंबातील ऑक्सलेट कम्पाउंडमुळे मूतखडाग्रस्त रुग्णांना अपाय होऊ शकतो.
- हिवाळ्यात लिंबू खाल्ल्यास सर्दी-खोकला वाढेल.
- रिकाम्या पोटी लिंबू प्यायल्यास काही लोकांना पोटदुखीचा त्रास होईल.
- मध किंवा साखरेसोबत लिंबू पाणी प्यायल्यास वजन वाढू शकते.
लिंबाशी संबंधित तुमच्या मनातील 18 प्रश्न | Lemon 18 FAQs
1. एक किलो लिंबाची किंमत किती आहे? | 1 Kg Lemon Price
लिंबाची किंमत हवामान आणि ठिकाणानुसार बदलते. सामान्यतः भारतामध्ये एक किलो लिंबाची किंमत 60 रुपये ते 120 रुपयांदरम्यान असते. उन्हाळ्यामध्ये लिंबाची मागणी वाढते, त्यामुळे किमतीही वाढतात. हिवाळ्यात किंमती तुलनेने कमी होती.
2. एका दिवसात किती लिंबांचं सेवन करावे?| Eka Divsat Kiti Limbu Khave
दिवसभरात एक किंवा दोन लिंबू खाणे पुरेसे ठरेल, याद्वारे शरीराला व्हिटॅमिन सीचा पुरवठा होईल. जास्त प्रमाणात लिंबू खाल्ल्यास अॅसिडिटी किंवा पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. पाण्यात किंवा जेवणावर लिंबू पिळून खाण्याची पद्धत फायदेशीर ठरेल. थेट लिंबू खाणे टाळा कारण यामुळे दातांवरील थराचे नुकसान होईल.
3. महिनाभर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पाणी मिक्स करून प्यायल्यास काय होईल?
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील आणि पचनप्रक्रिया सुधारेल. वजन कमी होण्यास मदत मिळेल आणि त्वचेवर तेज येईल. महिनाभर हा उपाय केल्यास तुम्हाला शरीर हलके वाटेल आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. पण जास्त प्रमाणात लिंबाचा वापर करू नये.
4. लिंबाचे सेवन कधी करू नये? | Limbu Kadhi Khau Naye
पोटामध्ये जळजळ, गॅस, अल्सर आणि अॅसिडिटीची समस्या असल्यास लिंबू खाणे टाळावे. सर्दी-खोकला किंवा घशामध्ये खवखव असल्यासही लिंबू खाऊ नये. मूतखड्याची समस्या असल्यास लिंबाचे सेवन कमी प्रमाणात करावे. गर्भवती महिलांनी लिंबू खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
5. लिंबू पाणी कधी पिऊ नये?| Limbu Pani Kadhi Piyu Naye
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे सर्वांसाठीच फायदेशीर ठरेलच, असे नाही. यामुळे काही लोकांना अॅसिडिटी किंवा गॅसचा त्रास उद्भवू शकतो. जेवणानंतर कधीही लिंबू पाणी पिऊ नये, यामुळे जठराग्निवर दुष्परिणाम होईल. रात्री झोपण्यापूर्वीही जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिऊ नये, अन्यथा पोटात जळजळ आणि वारंवार लघवीची समस्या निर्माण होईल.
6. लिंबामुळे कोणते आजार ठीक होऊ शकतात?
लिंबूतील पोषणतत्त्वांमुळे कित्येक आजार कमी होण्यास मदत मिळू शकते. यातील व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढेल. बद्धकोष्ठता, थकवा आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील. नियमित सेवन केल्यास ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रणात राहील आणि शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातील.
7. गरम पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यास काय होईल?
गरम पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यायल्यास शरीराची चयापचयाची गती जलद होईल आणि वजन नियंत्रणात राहील. यामुळे पचनप्रक्रिया सुधारले. त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसतील.
8. कोणते आजार असल्यास लिंबू पाणी पिऊ नये?अल्सर, अॅसिडिटी, गॅस, पोटदुखी, मूतखड्याची समस्या असल्यास लिंबू पाणी पिणे टाळावे. मधुमेहग्रस्तांनी लिंबू पाणी पिताना साखरेचा वापर करू नये. लिंबाच्या आंबटपणामुळे घशामध्ये खवखव तसेच मायग्रेनची समस्या वाढू शकते.
(नक्की वाचा : Coriander Water Benefits: सलग 15 दिवस धण्याचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरामध्ये होईल मोठा बदल)
9. लिंबाच्या सेवनाची योग्य वेळ कोणती?लिंबाचे सेवन कोमट पाण्यासह किंवा दुपारच्या जेववणासोबत करणे फायदेशीर ठरेल. अॅसिडिटी नसल्यास सकाळच्या वेळेस लिंबू खाऊ शकता. जेवणानंतर लगेचच लिंबू खाऊ नये, यामुळे पचनप्रक्रियेत अडथळे निर्माण होतील. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये हलक्या स्वरुपात लिंबाचा समावेश करू शकता.
10. दात न घासता लिंबू पाणी प्यावे का?दात न घासता लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील. पोट स्वच्छ होईल आणि पचनप्रक्रिया सुधारेल. आळस दूर होऊन फ्रेशही वाटेल.
11. पुरुषांसाठी लिंबू खाण्याचे फायदेलिंबू खाल्ल्यास पुरुषांनाही कित्येक फायदे मिळतील. शारीरिक थकवा दूर होईल आणि स्नायूपेशी मजबूत होतील.
(नक्की वाचा: Vitamin D: दुपारच्या उन्हाद्वारे Vitamin D मिळते? किती वाजता आणि किती वेळ उन्हात बसावे? AIIMSच्या डॉक्टरांनी दिली माहिती)
12. कोणत्या प्रकारच्या लिंबाचे सेवन करावे?ताजे आणि वजनदार असलेला लिंबू चांगला मानला जातो. फिकट पिवळा किंवा हिरव्या रंगाचा लिंबू रसाळ असेल. सुकलेल्या लिंबाचा वापर करणे टाळावे. देशी लिंबांमध्ये पोषणतत्त्वांचे प्रमाण अधिक असते.
13. रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे का?रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहील आणि पचनप्रक्रिया सुधारेल. दिवसभराचा थकवा दूर होईल. पण वारंवार लघवीची समस्या असल्यास तसेच अॅसिडिटी असेल तर रात्री लिंबू पाणी पिणे टाळावे.
14. डाळीमध्ये लिंबू पिळून खाल्ल्यास काय होते?डाळीमध्ये लिंबू पिळून खाल्ल्यास जेवणाची चव वाढेल आणि पचनप्रक्रियाही सुधारेल. शरीराला दुप्पट पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल.
15. लिंबू आणि मधाचे चाटण करून खाल्ल्यास काय होईल?घशामध्ये खवखव असल्यास मध-लिंबाचे चाटण फायदेशीर ठरेल. घशातील जंतूसंसर्ग कमी होईल. त्वचा चमकदार होईल आणि पचनप्रक्रिया सुधारेल. वजन कमी होण्यासही मदत मिळेल कारण यामुळे शरीराची चयापचयाची गती जलद होते.
16. सलग सात दिवस लिंबू पाणी प्यायल्यास काय होईल?सलग सात दिवस लिंबू पाणी प्यायल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज येईल. शरीरातील विषारीतत्त्व बाहेर फेकले जातील आणि रक्त शुद्धही होईल. मुरुमांची समस्या दूर होऊन त्वचा मऊ होईल. लिंबातील व्हिटॅमिन सीमुळे शरीरातील कोलेजन तयार होण्यास मदत मिळेल.
17. लिंबू पाण्यामुळे रक्तशर्करेची पातळी कमी होईल?लिंबामुळे शरीरातील रक्तशर्करेची पातळी कमी तर होणार नाही पण नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. मधुमेहग्रस्तांनी लिंबू पाण्यात साखर मिक्स करू नये.
18. कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस प्यायल्यास शरीराचे नुकसान होईल का?गरम पाण्यात मध कधीही मिक्स करू नये, कारण मध उष्ण प्रकृतीचे असते. मधुमेहग्रस्तांनी असे पाणी प्यायल्यास रक्तशर्करेची पातळी वाढेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

