आरोग्यासाठी हे 5 कुकिंग ऑइल सर्वात हानिकारक, तुम्हीही हेच जेवणात वापरताय? डॉ. साळुकेंनी सांगितला धोका

Unhealthy Cooking Oils: स्वयंपाकघरात वापरले जाणारे कोणते 5 कुकिंग ऑइल आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात? डॉ. शालिनी सिंग साळुंके यांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स आणि धोके जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Unhealthy Cooking Oils: चुकून जेवणात हे तेल वापरू नका, अन्यथा..."
Gemini AI

Unhealthy Cooking Oils: अनेकदा लोकांना वाटते की बाहेरचे अन्न खाल्ल्याने शरीराला इजा पोहोचू शकते, पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या किचनमध्ये ठेवलेले हे पाच तेल देखील असंख्य गंभीर आजारांना आयते निमंत्रण देऊ शकते. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. जनरल फिजिशियन, कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. शालिनी सिंग साळुंके यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याच पाच तेलांबाबतची माहिती दिली आहे. स्वयंपाकासाठी कोणते पाच कुकिंग ऑइल अजिबात वापरू नये, याबाबत डॉ. साळुंके यांच्याकडून माहिती जाणून घेऊया... 

पाहा व्हिडीओ

Advertisement

आरोग्यासाठी सर्वात हानिकारक तेल कोणते?  | Healthsathi Konte Tel Changal Nahi

1. वनस्पती तूप (डालडा)

डॉक्टर शालिनी यांच्या मते, वनस्पती तुपात ट्रान्सफॅटचे प्रमाण खूप जास्त आढळते, जे हृदयाशी संबंधित आजारांचे मोठे कारण बनू शकते. हृदयाशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांनी तुपाचे सेवन करणे टाळावे. 

2 . वारंवार गरम केलेले तेल

अनेकदा लोक एकच तेल वारंवार गरम करून वापरतात, पण तुम्हाला माहीत आहे का हे तुमच्या आरोग्याला किती नुकसान पोहोचवत आहे? डॉक्टर शालिनी यांचे म्हणणे आहे की वारंवार गरम केलेले तेल वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

3. पाम ऑइल (Palm Oil)

पाकीटबंद पदार्थांमध्ये पाम ऑइलचा सर्वाधिक वापर केला जातो. अशा स्थितीत जर तुम्हाला पाकीटबंद पदार्थ खाण्याची आवड असेल तर आजच तुमची सवय बदला; कारण यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वेगाने वाढवू शकते.

(नक्की वाचा: How To Get Rid Of Pigeons: कबूतरांना पळवण्याचे सुरक्षित औषध कोणते? कोणता वास आवडत नाही? जाणून घ्या प्रभावी उपाय)

Advertisement

4. सोयाबीन तेल

डॉक्टर शालिनी यांच्या मते, जर तुम्ही सोयाबीनच्या तेलाचे सेवन जास्त किंवा वारंवार करत असाल तर यामध्ये आढळणारे ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड शिरांमध्ये जमा होणाऱ्या खराब कोलेस्टेरॉलचा धोका वाढवू शकते.

(नक्की वाचा: Kitchen Ant Removal Hacks: किचनमधील रोजच्या मुंग्यांच्या त्रासाला कंटाळलात? 4 गोष्टींनी पटकन पळवून लावा मुंग्या)

5. कोणतेही रिफाइंड ऑइल 

डॉक्टर शालिनी यांच्या मते कोणतेही रिफाइंड ऑइल आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे याचा वापर करणे टाळले पाहिजे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)