Kitchen Ant Removal Hacks: किचनमध्ये थोडेसे अन्न सांडले की लगेचच मुंग्या लागतात. मुंग्यांच्या त्रासामुळे तुम्हीही हैराण झाले आहात का? खरं तर किचनमधील प्रत्येक घरात दिसून येणारी एक सर्वात मोठी समस्या म्हणजे मुंग्या. किचनच्या कट्ट्यावर खाद्यपदार्थ ठेवले की काही मिनिटांतच मुंग्या जमा होतात. कधी दुधाच्या भांड्यात, कधी मिठाईच्या डब्यात तर कधी रात्रीच्या उरलेल्या भाजी आणि पोळीलाही मुंग्या लागतात. मुंग्यांमुळे केवळ अन्न खराब होत नाही तर अनेकदा ते फेकूनही द्यावे लागते. जर तुम्ही सुद्धा रोजच्या या समस्येला कंटाळले असाल आणि वारंवार केमिकलयुक्त स्प्रे वापरू इच्छित नसाल तर काळजी करू नका. तुमच्या किचनमध्येच अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मुंग्यांच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. चला तर जाणून घ्या सविस्तर माहिती...
मुंग्यांपासून खाद्यपदार्थ कसे सुरक्षित ठेवावे? | How To Get Rid Of Ants In Kitchen
1. पाण्याची वाटी
जर तुमच्याकडे अशी एखादी वस्तू असेल जी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकत नाही तर एक मोठी आणि रुंद वाटी घ्या. त्यात थोडे पाणी भरा आणि त्याच्या मध्यभागी खाद्यपदार्थांचे भांडे ठेवा. पाण्यामुळे मुंग्या भांड्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत आणि तुमचे अन्न अगदी सुरक्षित राहील.
2. लवंग आणि दालचिनी
मुंग्यांची वास घेण्याची शक्ती खूप तीव्र असते. काही गोष्टींचा उग्र वास त्यांना अजिबात आवडत नाही. लवंग आणि दालचिनी त्यापैकीच एक आहेत. साखरेच्या डब्याभोवती किंवा मिठाईच्या डब्याभोवती चार ते पाच लवंग ठेवून द्या. लवंगेच्या वासामुळे मुंग्या डब्याजवळ फिरकणारही नाहीत.
(नक्की वाचा: Mosquito Spray: घरातल्या फक्त 3 गोष्टी अन् डासांचा खेळ खल्लास; केमिकलशिवाय डास पळवण्याचे सोपे घरगुती उपाय)
3. व्हिनेगर
व्हाइट व्हिनेगर (White Vinegar) मुंग्यांना पळवून लावण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. एका स्प्रे बाटलीमध्ये अर्धे पाणी आणि अर्धे व्हाइट व्हिनेगर मिक्स करून घ्या. अन्न ठेवण्यापूर्वी किचन स्लॅब किंवा डायनिंग टेबलवर स्प्रे करून कापडाने जागा स्वच्छ करून घ्या. व्हिनेगर मुंग्यांचे फेरोमोन्स (गंधाचा मार्ग) नष्ट करते, ज्यामुळे त्या भरकटतात आणि अन्नापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
(नक्की वाचा: How to Get Rid of Frogs:पावसामुळे घरात बेडूक येतोय? न मारता 'असे' दूर पळवा; 'या' वासाने होतील गायब!)
4. लिंबू
लिंबामध्ये असलेले सायट्रिक ॲसिड मुंग्यांना दूर ठेवते. लिंबाचा रस थोडासा पाण्यात मिसळून फरशी पुसू शकता किंवा टेबल पुसून घेऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world